MI vs RCB, IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) आयपीएलच्या (IPL) 48व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत आरसीबीने (RCB) पहिले फलंदाजी करत 5 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 146 धावा केल्या. आरसीबीकडून सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) दमदार अर्धशतक केले. पडिक्कलने 45 चेंडूत 74 धावा फडकालव्या. देवदत्तऐवजी जोश फिलिपने (Joshua Phillipe) 33 धावा आणि एबी डिव्हिलिअर्सने (AB de Villiers) 15 धावांचे योगदान दिले. आजच्या सामन्यात आरसीबीने आरोन फिंचला विश्रांती दिली असल्याने देवदत्तसोबत जोश फिलिपने डावाची सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदर नाबाद 10 आणि गुरकीरत सिंह मान नाबाद 14 धावा करून परतले.दुसरीकडे, एमआयसाठी (MI) जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 4 ओव्हरमध्ये 14 धावा देत 3 गडी, तर ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर आणि किरोन पोलार्ड यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. (IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने पूर्ण केले आयपीएलमधील विकेटचे शतक, RCB कर्णधार विराट कोहली ठरला पहिला आणि 100 वा बळी)
बेंगलोरसाठी सलामीला येत देवदत्त आणि जोश फिलीप यांनी पॉवर-प्लेच्या ओव्हरमध्ये दमदार सुरूवात करत 54 भागीदारी केली, पण दमदार सुरूवातीनंतर आरसीबीला आठव्या ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. जोश फिलिप 24 चेंडूत 33 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर देवदत्तने एका बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि 30 चेंडूत अर्धशतक ठोकले. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहली प्रभावी कामगिरी करू शकला नाही. बुमराहने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर विराट 9 धावा काढून झेलबाद झाला. विशेष म्हणजे कोहलीच्या विकेटसह आयपीएल कारकिर्दीत बुमराहच्या 100 विकेटही पूर्ण झाल्या. नंतर फटकेबाजी करण्याच्या नादात एबी डिव्हिलिअर्सही झेलबाद झाला. अंगावर आलेला चेंडू डिव्हिलिअर्स सीमारेषे पार पोहोचवू शकला नाही 15 धावांवर माघारी परतला. शिवम दुबेला 2 धावांवर बुमराहने परतीचा रास्ता दाखवला. दुबेपाठोपाठ बुमराहने देवदत्तला 74 धावांवर धाडलं.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नसून आरसीबीने तीन बदल केले. मुंबईसाठी रोहित शर्मा यंदाही मैदानात उतरला नाही तर आरसीबीने नवदीप सैनी, आरोन फिंच आणि मोईन अली यांच्याऐवजी शिवम दुबे, जोश फिलिप आणि डेल स्टेन यांना संधी दिली आहे.