अ‍ॅडम झांपा, विराट कोहली (Photo Credit: Twitter/Facebook)

इंडियन प्रीमिअर लीगची (Indian Premier League) 13 वी आवृत्ती अगदी काही दिवसावर असल्याने जगभरातील क्रिकेट चाहते क्रिकेट पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शनसाठी सज्ज होत आहेत. आयपीएलचे (IPL) काउंटडाउन सुरु झाले आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये होणार्‍या प्रसिद्ध टी-20 लीगची तयारी जोरात सुरू आहे. यादरम्यान, स्पर्धेतून खेळाडूंना माघार घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने आपले नाव मागे घेतले आहे. आरसीबीने (RCB) त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झांपाला (Adam Zampa) त्याच्या संघात स्थान दिले आहे. झांपा आरसीबीच्या ताफ्यात सामील झाल्यावर सोशल मीडिया यूजर्सनी मात्र मजेदार प्रतिक्रिया देण्याचे सत्र सुरु केले आणि विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधला. (IPL 2020: आयपीएल 13 मध्ये एबी डिव्हिलियर्स विकेटकीपरच्या भूमिकेसाठी करतोय कसून तयारी, पाहा उत्सुक चाहत्यांच्या प्रतिक्रिया)

आरसीबीने लिहिलेले, ‘आरसीबी रंगात अ‍ॅडम झांपाचे स्वागत करण्यासाठी आनंदि आहोत. त्याने केन रिचर्डसनची जागा घेतली.’ आयपीएलच्या एका सामन्यात 6 विकेट घेणारा जंपा एकमेव फिरकीपटू आहे. तो युएईच्या विकेटवरील आरसीबीसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. इतकंच नाही तर झांपाने 21 सामन्यात 7 वेळा कर्णधार विराटला बाद करण्याचा पराक्रम केला आहे. याचा फायदा घेत यूजर्सने आता कॅप्टन कोहलीला घाबरायची गरज नाही असे म्हटले.

कोहलीला चिंता करण्याची गरज नाही

झंपा विरुद्ध विराट कोहली

विराट अँड कंपनीने झंपाला विकत घेतले कारण तो झंपाला खेळू शकत नाही

योगायोग?

अ‍ॅडम झांपा आणि कोहली एकत्र खेळतील

रिचर्ड्सनच्या आयपीएलमधून बाहेर पडण्यावर आरसीबीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये आरसीबीनं सांगितलेय की, रिचर्ड्सन लवकरच बाप होणार आहे, त्यामुळे तो कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितोय आणि म्हणून त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. दुसरीकडे, आरसीबीच्या फिरकी विभागात युजवेंद्र चहल, मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर आणि पवन नेगी यांचा समावेश आहे. आणि आता झांपाच्या समावेशाने या विभागाला आणखीन ताकद मिळेल.