IPL 2020: आयपीएल 13 मध्ये एबी डिव्हिलियर्स विकेटकीपरच्या भूमिकेसाठी करतोय कसून तयारी, पाहा उत्सुक चाहत्यांच्या प्रतिक्रिया
एबी डिव्हिलियर्स विकेटकिपिंग (Photo Credit: Twitter/RCBTweets)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पोहचून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) वगळता सर्व टीम्सने सरावाला सुरुवात केली आहे. प्रत्येक टीममध्ये यंदाच्या 13 व्या हंगामासाठी काही बदल पहिले जाऊ शकतात. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) टीममध्ये देखील एक बदल होऊ शकतो आणि यासाठी चाहते मात्र उत्साहात आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा तुफानी फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यंदा फलंदाजी सोबत विकेटकीपरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. दुबईत फ्रेंचायझी सराव सत्रादरम्यान विकेटकीपिंग ड्रिल दरम्यान आरसीबी (RCB) चाहत्यांसाठी डिव्हिलियर्सचा फोटो शेअर केला. या फोटोनंतर यूजर्सने आपला अंदाज बांधायला सुरुवात केली, तर काहींनी या कल्पनेचे स्वागत केले, तर इतरांना प्लेग इलेव्हनमध्ये पार्थिव पटेलच्या जागेबद्दल शंका व्यक्त केली. (IPL 2020 Update: एबी डिव्हिलियर्स RCB साठी सांभाळणार विकेटकिपिंगची जबाबदारी, आयपीएल 13 पूर्वी प्रशिक्षक सायमन कॅटीच यांचे संकेत)

"आम्हाला वाटते की हे असे काहीतरी आहे ज्याची आपण सर्वांनी प्रतिक्षा केली असेल! # प्लेबोल्ड #आयपीएल2020 #WeAreChallengers," अशा कॅप्शनसह आरसीबीने विकेटकीपिंग ग्लोव्हजमध्ये डिव्हिलियर्सचा फोटो शेअर केला. युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला टॉप-ऑर्डरचा भाग बनवून आरसीबी प्लेइंग इलेव्हनमध्ये संतुलन साधू शकेल असेही काहींना वाटले. पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:

उत्तम

बर्‍याच दिवसानंतर...

व्वा शानदार...

बघून छान वाटलं

यावर्षी एबीडी विकेट करणार... 

मिस्टर 360

आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होईल, मात्र वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आरसीबी पुन्हा एकदा त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असेल. 2016 सह त्यानं टेन वेळा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु गेल्या तीन हंगामात प्रत्येक वेळी अंतिम प्रयत्नात ते कमी पडले. यंदा आयपीएलच्या लिलावात त्यांनाही काही मुख्य खेळाडूंना खरेदी केले. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार आरोन फिंच, क्रिस मॉरिस, केन रिचर्डसन, डेल स्टेन यांचा समावेश आहे.