IPL 2020 Update: 'एमएस धोनी काळजी घेईल'; 'थलाइवा'च्या नेतृत्त्व क्षमतेवर CSK CEO कासी विश्वनाथन यांनी व्यक्त केला विश्वास (Watch Video)
एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 सुरु होण्यापूर्वी 13 कोरोना पॉसिटीव्ह प्रकारणांनी चेन्नई सुपर किंग्ससमोर (Chennai Super Kings) संकट उभे केले. या बातमीने संघ बाहेर पडला नव्हता की त्यांचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने एकाएकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि शुक्रवारी स्टार ऑफस्पिनर हरभजन सिंहने देखील आखाती देशात जाऊन आपल्या संघात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर कोरोनाच्या धक्क्यातून सावरून सीएसकेने सरावाला सुरुवात केली आहे. रैना बाहेर पडल्यानंतर एका चाहत्याने सीएसकेच्या नवीन डेप्युटीची चौकशी केली. या प्रश्नाला उत्तर देताना ट्विटरवर म्हणाले, "आमच्याकडे शहाणा-कर्णधार असताना काळजी का करावी?" आता संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी महेंद्र सिंह धोनीवर (Mahendra Singh Dhoni) विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की 'थलाइवा' संघाची निश्चितपणे काळजी घेईल. (IPL 2020 Update: चेन्नई सुपर किंग्स संघाला दिलासा; सुरेश रैना पुन्हा CSK मध्ये दाखल होण्याची शक्यता)

एमएस धोनीने अशा अनेक परिस्थितीतून संघाला बाहेर काढले असल्याचेही विश्वनाथन यांनी म्हटले. विश्वनाथन यांनी सीएसके चाहत्यांना दिलेल्या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले की, सर्व खेळाडू चांगल्या मानसिकतेत आहेत आणि आगामी आयपीएल सामन्यांसाठी सज्ज आहेत. त्यांनी ठामपणे सांगितले की, 'येलो' फिवर देशभर नक्कीच वाढेल आणि "महत्त्वाच्या" चाहत्यांनी त्यांच्या संघाचे समर्थन करणे थांबवू नये. ‘‘हे निश्चित करण्यासाठी आहे की संघ चांगल्या स्थितीत आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही. आमच्याकडे एक कर्णधार आहे ज्याने आम्हाला बर्‍याच कठीण क्षणांतून बाहेर काढले आहे. थलाइवा नक्कीच संघाची काळजी घेईल आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही सराव सुरू केला आहे. खेळाडू देखील चांगल्या विचारात आहेत. त्यांची नियमित झूम बैठक होते जेथे प्रशिक्षक आणि कर्णधार खेळाडूंशी बोलतात व सर्व लोक मानसिकदृष्ट्या उत्कृष्ट आहेत. आम्ही खडतर परिस्थितीतून बाहेर येऊ आणि आयपीएलमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी संघ खूपच चांगल्या स्थितीत असल्याची बातमी देताना आम्हाला आनंद होत आहे.’’ विश्वनाथन यांनी पुढे म्हटले की, ‘‘मला खात्री आहे की चेन्नई सुपर किंग्जचा फॅन क्लब नक्कीच संघाकडे लक्ष देईल ज्याचा चांगला कामगिरीचा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की ‘येलो फीवर’ संपूर्ण देशात आणि दुबईमध्येही जिथे आमचे खूप चांगले फॉलोअर्स आहेत तिथे पसरेल. सीएसकेचे चाहते आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि आम्ही तुमच्या समर्थनाची अपेक्षा करतो.’’

दरम्यान, रविवारी बीसीसीआयने आयपीएल 2020चे संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर केले. टूर्नामेंटमधील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला जाईल. हा सामना मुंबईचे होम ग्राऊंड असलेल्या अबू धाबी येथे खेळला जाईल.