IPL 2020 Update: चेन्नई सुपर किंग्स संघाला दिलासा; सुरेश रैना पुन्हा CSK मध्ये दाखल होण्याची शक्यता
Suresh Raina (Photo Credits-IANS)

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा स्टार फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) हा आयपीएल (Indian Premier League) सोडून अलिकडेच भारतात परतला होता. वैयक्तिक कारणांमुळे तो आयपीएलमध्ये दिसणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. सध्या सुरेश रैना आपल्या कुटुंबासोबत आहे. सुरैश रैना भारतात परतल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सने त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला अद्याप संघात घेतलेले नाही. दरम्यान माजी विकेटकिपर दीप दासगुप्ता (Deep Dasgupta) याने सुरेश रैना परत संघात परतणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. (सुरेश रैनाने नातेवाईकांवर दरोडेखोरांच्या हल्ल्याबाबत सोडले मौन, पंजाब पोलिसांना प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती)

सुरेश रैना पुन्हा संघात दाखल होईल, मात्र सुरुवातीचे काही सामने तो खेळू शकणार नाही, असे माजी विकेटकिपर दीप दासगुप्ता याने म्हटले आहे. तसंच अद्याप CSK संघात सुरेश रैनाच्या जागी दुसरं कोणालाही घेण्यात आले नसल्याचेही दीप दासगुप्ता याने सांगितले. (सुरेश रैनाने अखेर आयपीएल 13 मधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट केले, 'CSK माझे कुटुंब आहे' म्हणत कमबॅकवर दिला इशारा)

दरम्यान अलिकेडच क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत सुरेश रैना याने CSK मध्ये पुन्हा दाखल होण्याचा इशारा दिला होता. क्वारंटाईनमध्येही सराव करत असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. तसंच पुढे तो म्हणाला की, "मी परत कधी CSK संघात परत येईल, याची तुम्हाला कल्पना नाही."

सुरेश रैना याने आतापर्यंत 193 सामन्यांमध्ये 189 इनिंग्स खेळत 5368 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर एक शतक आणि 38 अर्धशतकं आहेत. याशिवाय त्याने 69 सामन्यांत गोलंदाजी करत 25 विकेट्स घेतल्या आहेत.