संजय मांजरेकर (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध भाष्यकार आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये वादाशी चांगला संबंध जोडला आहे. वेळोवेळी त्यांनी खेळाडूंविषयी धाडसी विधाने केली आणि याचा परिणाम म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कमेन्टरी पॅनेलमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून त्यांची हकालपट्टी यावर्षी मार्चमध्ये करण्यात आली आणि त्याच कारणामुळे त्यांना आयपीएलच्या कमेन्टरी पॅनेलमध्येही जागा मिळाली नाही. मागील वर्षी वर्ल्ड कप दरम्यान रवींद्र जडेजाला ‘बिट्स अँड पिसेस’ म्हणून मांजरेकर यांनी वाद ओढवला होता आणि आता आयपीएल दरम्यान देखील त्यांना नवीन वादाला निमंत्रण दिले आहे. चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) दोन खेळाडू-पियुष चावला (Piyush Chawla) आणि अंबाती रायुडू (Ambati Rayudu) यांना ‘लो प्रोफाइल क्रिकेटर’ म्हणून संबोधल्यामुळे चाहत्यांनी पुन्हा त्यांची शाळा घेतली. या दोघांनी मोसमातील पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नईच्या दणदणीत विजयात प्रभावित केले होते. (MI vs CSK IPL 2020: अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिसच्या अर्धशतकाने चेन्नई सुपर किंग्सचा एकहाती विजय, मुंबई इंडियन्स 5 विकेट पराभूत)

त्यांनी ट्विटरवर पोस्ट लिहिली की, “पियुष चावला आणि अंबाती रायुडू या दोन लो-प्रोफाइल क्रिकेटपटूंसाठी खूप आनंद झाला आहे. चावलाने चेंडूने खळबळजनक कामगिरी केली. 5 वी आणि 16 वी ओवर टाकली. रायडू..वेल… त्याच्याकडून खेळल्या जाणाऱ्या शॉट्सच्या गुणवत्तेवर आधारित आयपीएलचा एक सर्वोत्तम डाव! चांगले केले CSK!”

मांजरेकर यांची ‘लो प्रोफाइल क्रिकेटर’ पोस्ट नेटकऱ्यांना मात्र फारशी पसंत पडली नाही ज्यांनी वादग्रस्त भाष्यकाराची शाळा घेतली. काहींनी त्याला चावला आणि रायुडूच्या क्रिकेटमधील योगदानाची आठवण करून दिली, तर काहींनी मांजरेकरांच्या रेकॉर्डवर व्यंगात्मक भाष्य केले. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया इथे पाहा...

लो प्रोफाइल??

हाहाहाहा... 

ही प्रोफाइल कोण ठरवते?

या प्रोफाइलमध्ये आपण कुठे असेल?

ते आपल्या प्रोफाइलपेक्षा चांगले आहेत!

चांगले शब्द निवडा...

मांजरेकर यांना आयपीएल 2020 मध्ये पुनरागमन करायचं होतं आणि कमेंट्री पॅनेलमध्ये पुन्हा पदभार स्वीकारण्यासाठी बीसीसीआयला पत्रही पाठवलं, मात्र बीसीसीआय त्यांना परत आणण्याच्या मूडमध्ये नव्हते आणि त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली. मांजरेकर यंदा आयपीएलमध्ये बऱ्याच इतर प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. दरम्यान, 2016 मध्ये हर्षा भोगले यांनाही बीसीसीआयने काढून टाकले होते, पण एक वर्षानंतर ते कमेंटरी पॅनलमध्ये परतले. दरम्यान, हंगामाच्या सुरुवातीच्या खेळात रायडू आणि चावला या दोघांनीही सीएसकेच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणार्‍या रायडूने फाफ डु प्लेसिससह 115 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. डु प्लेसिस 58 धावा करून नाबाद परतला.