ऑस्ट्रेलियाचा फलंदाज क्रिस लिन (Chris Lynn) याला त्याची बेस प्राइस 2 कोटीच्या किंमतीत खरेदी केल्यापासून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चर्चेत आहे. लिलाव होणारा लिन हा पहिला खेळाडू असल्याचे लक्षात घेता बर्याच चाहत्यांनी त्याच्यासाठी जास्त बोली लागण्याची अपेक्षा केली होती. आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध फ्रँचायझीने खरेदी केल्यावर लिनने ट्विटरवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. यात पोस्टमध्ये लिनने जसप्रीत बुमराह याचाही उल्लेख केला. त्यानंतर भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट आणि लिनमध्ये ट्विटरवर मजेदार संभाषण पाहायला मिळाले. आणि आता इन्स्टाग्रामवरील लाईव्ह व्हिडिओवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने संघाच्या लिलावावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहितने मजेदार प्रतिक्रिया दिली आणि ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईने आयपीएल (IPL) च्या लिलावात ढीगभर खेळाडू केले पाहून 2020 मध्ये पुन्हा एकदा घरच्या फ्रँचायझीसाठी डावाची सुरुवात त्याला करायला मिळणार की नाही याबद्दल कर्णधार संभ्रमात होता. (Don't Have To Play Against Bumrah! मुंबई इंडियन्स संघाने 2 कोटी रुपयांना क्रिस लिन याला खरेदी केल्यावर जसप्रित बुमराह याने दिली हटके प्रतिक्रिया)
या लिलावादरम्यान संघ मालक आकाश अंबानी यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी रोहितने "आता मी कुठे फलंदाजी करायची?? राष्ट्र जाणून घेऊ इच्छित आहे," असा गमतीशीर प्रश्न विचारला. पाहा रोहितची ही प्रतिक्रिया:
"Where will Rohit Sharma bat"
"Nation wants to known"
Lul kya item hai ye banda😂😂😂 pic.twitter.com/4eZxiBPiew
— Ahir Hari..!! (@Pull_Shot) December 19, 2019
दरम्यान, या लिलावाआधी मुंबई इंडियन्सकडे फलंदाजाच्या रूपात रोहितसह सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, ईशान किशन, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या यासारखे खेळाडू होते. आता यामध्ये लिन आणि सौरभ तिवारी याची भर पडली आहे. संघाने उचलेले हे पाऊल पाहून संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले कारण महेला जयवर्धने-प्रशिक्षित फ्रँचायझीला आता संघ निवडीच्या वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. लीन किती प्रतिभावान आहे माहिती असून त्याला बेंचवर बसवण्याचे पाऊल संघ उचलू शकत नाही, शिवाय ते डी कॉक किंवा रोहितलाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकत नाहीत. आणि जरी मुंबईने रोहितला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना इशान किंवा सूर्यकुमारला संघातून वगळावे लागेल.