क्रिस लिन आणि जसप्रीत बुमराह (Photo Credit: IANS/Getty)

कोलकाता येथे गुरुवारी आयपीएल (IPL) 2020 चा लिलाव झाला. 338 खेळाडूंच्या यादीमधील बरेच खेळाडू मोठ्या रकमेत विकले गेले, तर काही कमी किमतीत विकले गेले आणि बर्‍याच खेळाडूंना कोणीही विकत घेतले नाही. दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन फलंदाज क्रिस लिन (Chris Lynn) याला प्रथम लिलावात स्थान देण्यात आले. एकेकाळी कोलकाताचा भाग असणारा तुरळक फलंदाज लिनला त्याच्या बेस प्राईसवर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दोन कोटी रुपयांच्या किमतीत विकत घेतले. विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स आणि ऑस्ट्रेलियाचा माजी सलामी फलंदाज लिनला लिलावात अन्य कोणत्याही संघ मालकानीं पसंती दाखवली आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सने बेस प्राइसवर त्याला खरेदी केले. कोलकातामध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या लिलावात चढ-उतार पाहायला मिळाले. लिलावानंतर लिनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन आनंद व्यक्त केला आणि मुंबईच्या लोकांसह संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्याबद्दल एक चकित करणारे वक्तव्य केले. (IPL 2020 Auction: पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी क्रिकेटर, युवा खेळाडूही झाले मालामाल)

लिन म्हणाला, "मुंबई इंडियन्स, एक चांगले शहर, एक उत्तम फ्रँचायझी, सपाट विकेट्स आणि बुमराहविरुद्ध आता खेळणार नाही. आयपीएल 2020 ची वाट पाहू शकत नाही." 2014 पासून लिन कोलकातासोबत होते परंतु यावर्षी संघाने त्याला रिलीज केले होते. गुरुवारी लिलाव सुरू होताच लिनला बोली मिळाली आणि केवळ मुंबईने त्याच्यात रुची दाखवली. आयपीएलमध्ये लिनने आतापर्यंत 41 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 33 च्या सरासरीने 140 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने 1280 धावा केल्या आहेत. यात 10 अर्धशतकांचाही समावेश आहे. लिनच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत बुमराह याने नेहले पे देहला टाकत प्रतिसाद दिला आणि म्हणाला, "हाहा, संघात आपले स्वागत आहे! पण अजूनही नेट्समध्ये माझा सामना करावा लागणार आहेच." बुमराहची ही प्रतिक्रिया पाहून तर त्याचे चाहतेही म्हणतील हो... बरोबर.

लिनचे ट्विट

बुमराहची प्रतिक्रिया

2012 मध्ये लिनने डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) कडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा त्याला फक्त एक सामना खेळायला मिळाला होता. त्यानंतर तो हैदराबादकडूनही खेळला. 29 वर्षीय लिन हाजगभरात तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 18 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत आणि 19 च्या सरासरीने 291 धावा केल्या आहेत.