IPL 2020 PlayOffs: ठरलं! मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार क्वालिफायर-1, दुबई येथे होणार महामुकाबला
दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

IPL 2020 PlayOffs: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 55व्या साखळी सामन्यात दिल्लीने जबरदस्त विजय मिळवला आणि प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. आरसीबीविरुद्ध (RCB) आजच्या सामन्यातील विजयाने अंतिम-4 संघात स्थान मिळवणारा मुंबई इंडियन्सनंतर दिल्ली दुसरा संघ ठरला. दिल्लीने 16 गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. अशा स्थितीत आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 5 नोव्हेंबर रोजी पहिला क्वालिफायर सामना होणे निश्चित झाले आहे. आयपीएलचा पहिला क्वालिफायर दुबई येथे खेळला जाईल. आयपीएलच्या नियमांनुसार पॉईंट्स टेबलच्या पहिल्या दोन संघाना फायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी दोन संधी मिळते. भारतीय वेळेनुसार पहिला क्वालिफायर सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. (DC vs RCB, IPL 2020: दिल्लीची बल्ले-बल्ले! धवन-रहाणेच्या अर्धशतकाने DC ची रॉयल चॅलेंजर्सवर 6 विकेटने मात, प्ले ऑफसाठी केले क्वालिफाय)

दरम्यान, मुंबई आणि दिल्लीने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे, तर आजच्या सामन्यात पराभव झाल्यावरही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने क्वालिफाय केले आणि पॉईंट्स टेबलवर तिसरे स्थान मिळवले.  शिवाय, हैदराबादकडे आणि केकेआर यांच्याकडे देखील प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. हैदराबादच्या मंगळवार, 3 नोव्हेंबर रोजी आयपीएलच्या साखळी सामन्यातील अंतिम सामना खेळला जाईल त्यानंतर प्ले ऑफमधील चौथी टीम कोणती असेल हे निश्चित होईल. हैदराबादला चौथे स्थान मिळवण्यासाठी फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईचा पराभव करणे गरजेचे आहे.

7 नोव्हेंबर रोजी दुबई येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता पहिला क्वालिफायर खेळला जाईल. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी अबू धाबी येथे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात एलीमिनेटर सामना आयोजित केला जाईल. सामना जिंकणारा संघ दुसर्‍या क्वालिफायरमध्ये पहिला क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाचा सामना करेल, तर एलिमिनेटर सामना गमावलेल्या संघाचा प्रवास आयपीएल 2020 मध्ये संपुष्टात येईल. दुसरा क्वालिफायर सामना 8 नोव्हेंबरला अबु धाबीच्या मैदानावर खेळला जाईल. आणि अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होणार आहे.