IPL 2020 Auction: पॅट कमिन्स, आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासाठी लागली सर्वाधिक बोली, यूजर्सने Memes शेअर करत दिल्या मजेदार प्रतिक्रिया, पाहा Tweets
पॅट कमिन्स (Photo Credits: File Image)

कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या सत्रातील खेळाडूंचा लिलाव सुरू झाला. 73 जागांसाठी 338 खेळाडूंची बोली लावली जात आहे. फलंदाजांमध्ये इंग्लंडचा विश्वचषक विजेता इयन मॉर्गन याला कोलकाता नाईट रायडर्सने 5.25  कोटींची खरेदी केले. त्याची बेस प्राईस दीड कोटी होती. मात्र, इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला मोठी बोली मिळाली. कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने सर्वात मोठी रकम देऊन विकत घेतले. आणि आता कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा दुसरा महागडा खेळाडू आहे. कमिन्सला केकेआरने 15.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. वर्ष 2017 मध्ये बेन स्टोक्स याला राजस्थान रॉयल्सने 14.5 कोटीमध्ये खरेदी केले होते. कमिन्सने 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.  कमिन्सला 2018 साली मुंबई इंडियन्सकडून विकत घेण्यात आले होते. पण तो एकही सामना खेळू शकला नव्हता आणि दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता.

याशिवाय, क्रिकेटमधून काही काळ ब्रेक घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेल याच्यासाठी पुन्हा सर्वाधिक बोली लावण्यात आली. किंग्स इलेव्हन पंजाबने मॅक्सवेलसाठी 10.75 कोटी कारच केले. यंदाच्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकारांचा कर्णधार आरोन फिंच याच्यासाठीही मोठी बोली लावली. फिंचला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 4.4 कोटी रुपयांत खरेदी केले. ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या लिलावातील वर्चस्वानंतर सोशल मीडिया यूजर्सनेही त्यांच्या खास अंदाजात म्हणजेच मिम्स बनवत प्रतिक्रिया दिल्या आणि या पाहून तुम्हालाही नक्कीच हसू येईल.

ऑस्ट्रेलियन आत्ता: -

लिओनेल मेस्सी

2 कोटीनंतर बोली लावण्यानंतर पाकची प्रतिक्रिया

लिलावानंतर ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स आणि मॉर्गन

केकेआर इतर संघांना

भारतीय खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, युसूफ पठाण आणि स्टुअर्ट बिन्नी अनसोल्ड राहिले, तर रॉबिन उथप्पा याला 3 कोटींमध्ये राजस्थान रॉयल्सने संघात शामिल केले. दुसरीकडे, विंडीजचा प्रभावी गोलंदाज शेल्डन कोटरेल याला किंग्स इलेव्हन पंजाबने 8.50 कोटी रुपयांत खरेदी केले.