IPL 2020 Auction: 'या' महिन्यात होणार आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव, यंदा फ्रँचायझी करू शकणार 86 कोटी रुपयांचा खर्च
(Photo: Facebook)

इंडियन प्रीमियर लीग, (आयपीएल) चा 13 वा सीजन सुरु होण्यास काही महिने बाकी आहे. आयपीएल 2020 ची सुरुवात एप्रिल महिन्यात होईल आणि यासाठी आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात तयारीची सुरूवात झाली आहे. यासह या टूर्नामेंटसाठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख देखील समोर आली आहे. पण, त्याआधी प्रत्येक फ्रँचायझी ट्रे़डिंग विंडोच्या माध्यमातून आपल्या संघात खेळाडूंची भर घालत आहेत. तर काहीफ्रँचायझी नवीन सपोर्ट स्टाफची निवड करत आहे. मागील वर्षांपासून यंदाच्या हंगामात अनेक संघात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध खेळाडूंची एका संघातून दुसऱ्या संघात बदली केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, आयपीएलच्या 13 व्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव  यावर्षी डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात होणार आहे. मागील वर्षीही लिलाव डिसेंबरमध्ये झाला होता. (IPL 2020 आधी विराट कोहली च्या रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ला मोठा झटका, 2019 मध्ये ब्रँड व्हॅल्यू त 8 टक्क्यांनी घट)

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, आयपीएल अधिकारी डिसेंबरमध्ये लिलाव घेण्याची योजना आखत असून लवकरच याबाबत तारीख जाहीर होईल. दरम्यान, पुढील वर्षी, 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी निश्चितच लक्षात घेतली जाईल. 2019 मध्ये, विश्वचषकमुळे आयपीएल लवकर आयोजित करण्यात आले होते, पण पुढील वर्षी टी-20 विश्वचषक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने कोणीही समस्या नसल्याकारणाने आयपीएल नियोजित वेळी होईल. त्यामुळे, खेळाडूंकडे चांगले प्रदर्शन करून संघात स्थान मिळवण्याची संधी आहे.

दुसरीकडे, असेही म्हटले जात आहे की यंदा फ्रँचायझी त्यांच्या खात्यात 3 कोटी रुपये जोडू शकतात, परंतु अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, असे झाल्यास प्रत्येक संघ खेळाडूंच्या लिलावासाठी 86 कोटी रुपये खर्च करु शकतात.