भारत आणि न्युझीलंड (IND vs NZ) याच्यात शुक्रवार पासुन टी-20 मालिका (T20I Series) खेळवली जाणार आहे. विश्वकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारतीय संघ स्पर्धेतुन बाद झाला. यानंतर भारतीय संघ टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून न्युझीलंडला गेला पण या संघात वरिष्ठ खेळांडूना आराम देण्यात आला आणि युवा संघाला संधी देण्यात आली. भारताचा अष्टपेलु खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात भारतीय युवा संघ मैदानात उतरणार आहे. जरी या संघात वरिष्ठ खेळाडू नसले तरी ही मालिका किवी संघासाठी सोपी नसणार आहे. या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास, त्यालाही पुष्टी मिळते.
दोन्ही संघामधील हेड टू हेड आकडेवारी
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत, त्यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने नऊ सामने जिंकले आहेत. एक सामना असा होता की ज्यात कोणताही निकाल लागला नाही. म्हणजेच हे आकडे बघितले की ही स्पर्धा तुल्यबळ आहे हे समजू शकते. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार असून पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, भारतीय संघ मोठ्या खेळाडूंशिवाय युवा ब्रिगेडच्या आधारावर स्पर्धा करेल. (हे देखील वाचा: IND vs NZ T20I 2022: रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतानाही केन विल्यमसनला भारतीय संघाची भीती, केले हे वक्तव्य)
दोन्ही संघाचे खेळाडू
भारताचा टी-20 संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडचा टी-20 संघ: केन विल्यमसन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.