India vs West Indies ODI Series: भारतीय संघाची घोषणा; विराटकडे नेतृत्वाची धुरा
Indian Team | (Photo Credits- Twitter @imVKohli)

वेस्टइंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी  भारताचा संघ जाहीर झाला आहे. कसोटी मालिकेत वेस्टइंडिजचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघ ५ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एशिया कपमध्ये विश्रांती दिल्यानंतर विराट कोहली संघात परतला असून कर्णधारपद त्यालाच देण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनचे सुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.

दिनेश कार्थिकच्या जागी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं असून रवींद्र जडेजाला अजून एक संधी देण्याचं निवड समितीने ठरवले आहे. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या आणि केदार जाधव संघातून बाहेर झाले आहेत.

भारतीय संघ:

भारत आणि वेस्टइंडीज पहिला सामना ऑक्टोबर २१ ला गुवाहाटी येथे खेळणार आहेत. तर दुसरा सामना विशाखापटनमला २४ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. दोन्ही सामने हे दिवस रात्र खेळवण्यात येतील.