Team India Schedule: टीम इंडियाचे  2024 संपूर्ण वेळापत्रक आलं समोर, जूनमध्ये T20 वर्ल्डकप खेळणार
Team India (Photo Credt - Twitter)

भारतीय संघाची (Team India) नवीन वर्षाची (New Year) सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. हा सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान केपटाऊनच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान भारतीय संघाचं आगामी वर्षातील वेळापत्रक समोर आले आहे. या वर्षात भारत दक्षिण आफ्रिका, अफगाणीस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. (हेही वाचा - IND Playing 11 vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीत भारत दोन बदलांसह उतरु शकतो मैदानात, अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन)

पाहा पोस्ट -

आगामी वर्षात भारतीय संघ टी-20 वर्ल्डकप जूनमध्ये खेळणार आहे. टी -20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे आयोजन वेस्टइंडिज आणि अमेरिकेत केले जाणार आहे. वर्ल्डकप 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा भारताचा मानस असेल.

दरम्यान जानेवारीमध्येच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. इंग्लंडचा संघ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. क्रिकेट चाहत्यांना टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वी 5 कसोटी सामने खेळणार आहे.मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 7 मार्च रोजी खेळला जाणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. गेल्या 2 मालिकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलं आहे.