IND vs NZ (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team  Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune)  खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आज खेळाच दुसरा दिवस आहे. त्याआधी, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने रोहित शर्माची विकेट गमावून 16/1 धावा केल्या आहे. सध्या शुभमन गिल 10 आणि यशस्वी जैसवाल 6 धावांवर खेळत आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळपट्टीचा अहवाल

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळू शकते. ही खेळपट्टी काळ्या मातीपासून तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवर अजिबात गवत नसेल. या खेळपट्टीवर चेंडू केवळ जास्त वळणार नाही तर तो कमी उसळीही घेईल. म्हणजेच, अशी खेळपट्टी ज्यामध्ये फिरकीपटू फलंदाजांना त्यांच्या फिरकीने नाचवू शकतात. कमी आणि संथ वळणाची परिस्थिती पाहता भारताचे फिरकीपटू अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारत पुन्हा एकदा तीन फिरकी गोलंदाजांची निवड करू शकतो, जरी संथ गोलंदाजांची निवड पहिल्या कसोटीपेक्षा वेगळी असू शकते.

कसे असेल हवामान

पुण्यात पावसाची शक्यता नसल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. अशा स्थितीत हा सामना पूर्णपणे खेळवला जाईल. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. मात्र, काळानुसार उष्मा वाढणार असून दुपारी तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. अनपेक्षितपणे थोडासा रिमझिम पाऊस झाला तर त्याचा सामन्यावर परिणाम होणार नाही. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test Day 1 Stump Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताने एक विकेट गमावून केल्या 16 धावा; न्यूझीलंड पहिल्या डावात 259 ऑलआऊट)

कसोटी क्रिकेटमधील न्यूझीलंड विरुद्ध भारत हेड-टू-हेड रेकॉर्ड (IND vs NZ Test Head to Head)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांनी एकमेकांविरुद्ध 63 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाने 22 कसोटी सामने जिंकले. दुसरीकडे, न्यूझीलंडने 14 जिंकले आहेत. 27 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत, परंतु अलीकडेच कसोटी सामन्यांचे निकाल समोर आले आहेत. त्यामुळे या मालिकेतील उरलेल्या सर्व दोन सामन्यांमध्ये निकाल लागेल अशी आशा करू शकतो. भारतामध्ये, न्यूझीलंडने केवळ तीन कसोटी सामने जिंकले आहेत. भारताने मायदेशात खेळल्या गेलेल्या 37 पैकी 17 कसोटी सामने जिंकले आहेत, तर 17 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिल्या कसोटी 2024 मधील प्रमुख खेळाडू (Key Players): शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रचिन रवींद्र, टिम साउथी, एजाझ पटेल, मिचेल सँटनर हे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग कसा बदलायचा हे माहित आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी 2024 मध्ये मिनी बॅटल (Mini Battle): टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुस-या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक मिनी बॅटल दिसू शकतात. शुभमन गिल विरुद्ध टीम साउथी ही एक अशी स्पर्धा आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, विराट कोहली आणि मिचेल सँटनर यांच्यातही लढत होणार आहे. हे दोन मिनी सामने सामन्याचा निकाल ठरवू शकतात. याशिवाय ऋषभ पंत आणि एजाज पटेल यांच्यात वेगळे युद्धही रंगणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी कधी आणि कुठे होणार आहे?

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस 25 ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 09:30 पासून खेळवला जाईल.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. याशिवाय, लेटेस्टलीच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रत्येक लाइव्ह अपडेट मिळेल.