India Women vs South Africa Women 5th ODI Live Streaming: भारत रत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम (Ekana Cricket Stadium) येथे होणाऱ्या पाच महिला वनडे मालिकेच्या पाचव्या किंवा अखेरच्या सामन्यात भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ आमने-सामने येतील. आफ्रिकी महिला संघाने यापूर्वीच मालिका 3-1 अशा फरकाने खिशात घातली आहे तर मिताली राजचा (Mithali Raj) यजमान संघ दुसरा विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. भारत महिला संघाने दुसरा सामना 9 विकेटने जिंकला तर दक्षिण आफ्रिका महिलांनी पहिला सामना 8 विकेटने जिंकला आणि आणि शेवटचे दोन सामने अनुक्रमे 6 धावांनी (DLS नियम) व 7 विकेटने जिंकला. भारत महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात 5वा वनडे सामना 17 मार्च, बुधवार रोजी खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना सकाळी 9.00 वाजता सुरू होईल तर नाणेफेक सकाळी 8.30 वाजता होईल. भारतीय प्रेक्षक टीव्हीवर सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात, तर ऑनलाईन स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर उपलब्द असेल. (ICC Women's ODI Rankings: भारताच्या Punam Raut ची टॉप-20 महिला वनडे फलंदाज क्रमवारीत एंट्री, Lizelle Lee ची पहिल्या स्थानी झेप)
महिला संघाने ही वनडे मालिका गमावली असली तरी या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात ते तितकेच महत्त्व देतील कारण त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. या मालिकेत यजमान संघासाठी पुनम राऊत सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने चार डावांमध्ये 253 धावा केल्या आहेत. दरम्यान, कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर स्मृती मंधाना यांनीही या मालिकेत प्रत्येकी एक अर्धशतक ठोकले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका महिला संघाने मालिका जिंकली असली तरी अखेरचा सामना जिंकून ही मालिका आणखी दृढ मार्गाने पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार असेल. तथापि, आता त्यांच्याकडे इतर काही खेळाडूंचा उपयोग करण्याची चांगली संधी आहे.
असा आहे भारत महिला -दक्षिण आफ्रिका महिला वनडे संघ
भारतीय महिला संघ: मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना, जेमिमाह रोड्रिग्स, पूनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), दयालन हेमलथा, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (विकेटकीपर), श्वेता वर्मा (विकेटकीपर), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा आणि मोनिका पटेल.
दक्षिण आफ्रिका महिला संघ: सुने लुस (कॅप्टन), आयबोंगा खाका, शबनीम इस्माईल, लॉरा वोल्वार्ड, तृषा चेट्टी, सिनोलो जाफ्ता, तस्मीन ब्रिट्झ, मेरीझान कॅप, नोन्डुमिसो शांगसे, लिझेल ली, अनेक बॉश, फाये टॉनिकलिफ, नॉनकुलुलेको मलाबा, मिग्नॉन डू प्रीझ, नाडाईन डी क्लार्क, लारा गुडॉल, तूमी सेखुखूने.