ICC Women's ODI Rankings: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) रायपूरमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेच्या चौथ्या सामन्यात नाबाद शतकी खेळीचा भारतीय (India) फलंदाज पूनम राऊतला (Punam Raut) आयसीसीच्या महिला वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला. मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत Women's ODI Rankings) पूनमने पहिल्या 20 फलंदाजांमध्ये सहभागी झाली आहे. मागील तीन सामन्यात 62, 77 आणि नाबाद 104 धावांच्या जोरावर राऊतने आठ स्थानांची झेप घेत रँकिंगमध्ये 18वे स्थान पटकावले आहे. भारतीय ओपनर स्मृती मंधाना सातव्या स्थानावर असून 9व्या स्थानावर कर्णधार मिताली राज यांचे स्थान कायम राहिले आहे. शिवाय, उपकर्णधार हरमनप्रीत कौरने दोन स्थानांची झेप घेत 15वी रँकिंग मिळवली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची सलामी फलंदाज लिझेल ली (Lizelle Lee) हिने 7 स्थानांची झेप घेत आयसीसी महिला वनडे क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. (IND vs ENG ODIs 2021: टीम इंडियाच्या ताफ्यात वनडे मालिकेसाठी सामील होणार नवीन अस्त्र, डोमेस्टिक लीगमध्ये कुटल्या धावा)
भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी म्हणून लीझल लीला क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे. इंग्लंड सलामीवीर टेमी ब्यूमॉन्टला क्रमवारीत ढकलत मानाचे स्थान पटकावण्यासाठी लिझेलने तीन सामन्यात नाबाद 132 आणि 69 धावांची धमाकेदार खेळी केली. महिला एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारी ती दक्षिण आफ्रिकेची पहिली खेळाडू आहे. शिवाय, गोलंदाजांच्या क्रमवारीत मालिकेच्या तीन सामन्यात पाच विकेट घेणारी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर घसरली आहे. वेगवान गोलंदाज मानसी जोशी 69व्या स्थानावरुन 64व्या स्थानावर आली आहे. गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा अयाबोंगा खाकाला एका स्थानाचा फायदा झाला आणि तिने 9वे स्थान मिळवले.
Take a bow, @zella15j 💥
Her superb form in the ongoing series against India has helped Lizelle Lee shoot up to the top of the @MRFWorldwide ICC Women's ODI Rankings for batters! pic.twitter.com/yAU76yfl6x
— ICC (@ICC) March 16, 2021
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील वनडे मालिकेबद्दल बोलायचे तर पाहुण्या संघाने चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आणि दोन्ही संघात रायपूरच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर पाचवा आणि अंतिम सामना 16 मार्च रोजी खेळला जाणार आहे.