IND-W vs SA-W 4th ODI: पूनम राऊत (Poonam Raut) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांचे फलंदाजीचे प्रयत्न व्यर्थ ठरले कारण चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारतीय महिला संघाला (India Women's Team) रविवारी पाच सामन्यांची मालिकेत 7 विकेटने पराभव पत्करावा लागला. फलंदाजी करण्यास सांगितले असता राऊतने नाबाद 104 धावा फटकावल्या आणि हरमनप्रीतने अर्धशतक झळकावत भारताला 50 षटकांत 4 बाद 266 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात सलामी फलंदाज लिझल ली (Lizelle Lee), कर्णधार लौरा वोल्वार्ड्ट, मिग्नॉन डू प्रीझ आणि लॉरा गुडॉल (Laura Goodall) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात कामगिरी अर्धशतकी कामगिरी केली. लीने सर्वाधिक 69 धावा केल्या तर कर्णधार लौराने 53, डू प्रीझने 61 आणि गुडॉल नाबाद 59 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाने 48 ओव्हरमध्ये तीन बाद 269 धावा केल्या. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. (Mithali Raj ने रचला विक्रम; ठरली 10,000 धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू)
भारताकडून मागील तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी यंदा सामन्यात संधी मिळालेल्या प्रिया पुनिया आणि स्मृती मंधाना यांना फार खास कामगिरी करता आली नाही. 16व्या ओव्हरमध्ये 2 बाद 61 अशी अवस्था असताना अनुभवी पूनमने कर्णधार मिताली राजसह संघाचा डाव सावरला. पूनमने वनडे कारकिर्दीतील तिसरे शतकी धावसंख्या गाठत 123 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी केली. मितालीने 45 तर उपकर्णधार हरमनप्रीत कौरने 54 धावांसह पूनमला मोठी साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून तुमी सेखकुनेने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. टीम इंडियाने दिलेले 267 धावांचे लक्ष्य आफ्रिकी महिला संघाला गाठणे सोपे नसेल असे दिसत असताना संघाच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतक झळकावले आणि भारतीय गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला.
दरम्यान, आजच्या सामन्यात विजय मिळववत दक्षिण आफ्रिकेने मालिका देखील खिशात घातली आहे. दुसरीकडे, 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 263 धावांनी मागे टाकत क्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतच्या त्यांच्या सर्वाधिक धावांचा पाठलाग केला आहे. यानंतर, मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना 17 मार्च रोजी खेळला जाईल.