भारतीय किक्रेटपटू मिताली राज (Mithali Raj) हिने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. वनडे क्रिकेट मधील सर्वोकृष्ट खेळाडू असलेल्या मितालीने तिच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत नवीन उंची गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) दुसऱ्या सामना हा मिताली राजच्या करीयरमधला 310 वा सामना होता. हा सामना खेळताना सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम मिताली राजने आपल्या नावे केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये मिताली राजने 50 चेंडूत 36 धावा करुन आपल्या वनडे करियरमधील 10000 धावा पूर्ण केल्या. हा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
यापूर्वी 10000 धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या Charlotte Edwards च्या नावे होता. मितालीने आपल्या क्रिकेट करीयरमध्ये 10 कसोटी सामने, 211 वनडे सामने आणि 82 टी-20 सामने खेळले आहेत. मिताली राज ने 1999 मध्ये आर्यलंड विरुद्ध भारतासाठी आपला डेब्यू सामना खेळला होता.
पहा ट्विट:
Legend Alert 🚨
Mithali Raj completes 10k international runs 🤩https://t.co/Qg236P6Y9M #INDWvSAW pic.twitter.com/CItdM83p6I
— Cricbuzz (@cricbuzz) March 12, 2021
(हे ही वाचा: तामिळ भाषेवरून ट्रोल करणाऱ्या चाहत्याची 'Proud Indian' मिताली राज ने केली बोलती बंद, ट्विटरवरून दिले सडेतोड उत्तर)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने 9 गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आज या मालिकेतील तिसरा सामना अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर सुरु झाला असून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. हा सामना जिंकून या मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.