Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

IND 209/4 in 18.4 Overs (Target 207/5) | भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध 6 विकेटने विजय, विराट कोहली याचा एकतर्फी खेळ 

क्रिकेट टीम लेटेस्टली | Dec 06, 2019 10:33 PM IST
A+
A-
06 Dec, 22:31 (IST)

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 6 विकेटने विजय मिळवला. विराट कोहली याने सर्वाधिक 94 धावा केल्या, तर सलामी फलंदाज केएल राहुल ने 62 धावांचे योगदान दिले. 

06 Dec, 22:27 (IST)

17.6 षटकांत भारताला चौथा धक्का बसला. श्रेयस अय्यरला कीरोन पोलार्डने झेलबाद केले. अय्यर 6 चेंडूत 34 धावा काढून पॅव्हिलियनमध्ये परतला. नवीन फलंदाज शिवम दुबे दाखल झाला आहे.

06 Dec, 22:17 (IST)

शेल्डन कॉटरेलने वेस्ट इंडिजसाठी महत्वाची ओव्हर टाकली. आणि दुसऱ्याचा चेंडूवर रिषभ पंतला झेल बाद केले. पंतने 18 धावांची खेळी केली. भारताला तिसरा धक्का बसला आहे, पण कर्णधार विराट कोहली ने संघाचा विजय निश्चित केला आहे. 

06 Dec, 22:00 (IST)

जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. विराटने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे हे 23 वे टी-20 अर्धशतक असून सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत त्याने रोहितला मागे टाकले आहे.

06 Dec, 21:54 (IST)

करी पियरे याच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर केएल राहुल माघारी परतला. पियरेने भारताला मोठा झटका दिला आणि राहुल 40 चेंडूत 62 धावांवर पॅव्हिलिअनमध्ये परतला. 

06 Dec, 21:49 (IST)

रोहित शर्मासह डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या राहुलने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले. टीम इंडियाला विजयासाठी 42 चेंडूत 85 धावांची गरज आहे. राहुलने कर्णधार विराट कोहली याच्यासह चांगली भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेकडे नेले आहे. 

06 Dec, 21:32 (IST)

केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांमध्ये 42 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली आहे. 10 ओव्हरचा खेळ झाला आहे आणि भारताने 1 बाद 89 धावा केल्या आहेत.

06 Dec, 21:21 (IST)

खारी पियरे सहावी ओव्हर टाकण्यासाठी आला. पियरेच्या दुसर्‍या बॉलवर राहुलने स्लॉग शॉटवर षटकार मारला आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम राहुलने केवळ 28 डावात केला. 

06 Dec, 21:06 (IST)

चौथी ओव्हर टाकण्यासाठी विंडीजसाठी फिरकीपटू खरे पियरे गोलंदाजीला आला आहे. आणि ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर रोहित शर्मा बाद झाला. भारताला पहिला धक्का बसला. रोहितने 10 चेंडूंत 8 धावा केल्या. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित सीमारेषेवर कॅच आऊट झाला. 

06 Dec, 20:36 (IST)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 5 गडी गमावून 207 धावा केल्या. भारताला विजयासाठी 208 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले आहे. वेस्ट इंडिजकडून शिमरोन हेटमेयर याने सर्वाधिक धावा केल्या. हेटमेयरने 2 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावा केल्या. 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य भारताने केवळ तीन वेळा गाठले आहे आणि 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Load More

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना लवकरच सुरू होईल. वेस्ट इंडीजने भारताविरुद्ध खेळले गेलेले शेवटचे 6 टी-20 सामने गमावले आहेत. त्यामुळे, यंदाच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघ भारतीय संघाच्या विजयाची ही लय तोडण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, भारतीय संघ विंडीजवर वर्चस्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.  भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजवर 14आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 8 सामने भारतीय संघाने जिंकले आहेत तर 5 सामने कॅरेबियन संघाने जिंकले आहेत. त्याचवेळी, एक सामना निष्फळ होत होता. 2009 मध्ये भारत आणि विंडीज संघात टी-20 सामने खेळण्यास सुरुवात झाली. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी सुरु करेल. टीम इंडियाने यापूर्वी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात घरातील 3 सामन्यांच्या मालिकेत बांग्लादेशला 2-1 असे पराभूत केले होते. या मालिकेद्वारे विराट कोहली (Virat Kohli) मर्यादित षटकांच्या मालिकेत पुनरागमन करणार आहे.

दुसरीकडे, 2016 विश्वचषक विजेता विंडीज संघ मागील दोन वर्षांपासून टी-20 क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. यावेळी विंडीजने एकूण 23 टी-20 सामन्यांमध्ये केवळ 5 मध्ये विजय मिळवला आणि 18 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. भारत दौऱ्यापूर्वी विंडीजचा अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने पराभव झाला होता. त्यामुळे विंडीज संघ वर्षाचा शेवट तरी गोड करू पाहत असेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

असा आहे भारत आणि विंडीज संघ:

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मनीष पांडे, केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

वेस्ट इंडीज: किरोन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, फॅबियन एलन, शेल्डन कोटरेल, शिमरोन हेटमेयर, जेसन होल्डर, ब्रॅंडन किंग, एव्हिन लुईस, किमो पॉल, खेरी पियरे, दिनेश रामदिन (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमंस, केसरीक विल्यम्स, हेडन वाल्श जूनियर.


Show Full Article Share Now