भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत चौथ्या दिवशी विजय मिळवला. पुणे कसोटी जिंकल्यानंतर भारताने इतिहास रचून जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर खेळताना हा भारताचा सलग 11 वा कसोटी मालिका विजय आहे. या प्रकरणात भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
India vs South Africa 2nd Test Day 4 Updates: भारताने डाव आणि 137 धावांनी विजय मिळवत जिंकली मालिका
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपण्याआधी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांनी संपुष्टात आला. आणि भारताला 326 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून आर अश्विन (R Ashwin) याने चार, तर उमेश यादव (Umesh Yadav) याने तीन गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज (Keshav Maharaj) याने सर्वाधिक 72 धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसीने (Faf du Plessis) 64 धावा केल्या तर वर्नोन फिलेंडर नाबाद 44 धावा करून परतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला 326 धावांची आघाडी असून टीम इंडिया फॉलोऑन देते की नाही याचा निर्णय आज घेण्यात येईल. यापूर्वी टीम इंडियाने त्यांचा पहिला डाव 601 धावांवर घोषित केला होता. केशव महाराज आणि वर्नोन फिलेंडर यांनी 109 धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना परेशान केले.
सकाळच्या सत्रातील मोहम्मद शमी याची शानदार गोलंदाजी आणि रिद्धिमान साहा याचा अप्रतिम झेल आकर्षणाचे केंद्र राहिले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीस आणि क्विनटोन डिकाक हे डाव साकारण्याचा प्रयत्न करीत होते. दोघांची 75 धावांची भागीदारी अश्विनने डी कॉकला बाद करून मोडली. सकाळच्या सत्रात शमीने 10 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन दोन गडी बाद केले तर उमेशने आठ ओव्हरमध्ये 27 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फलंदाजांना उपयुक्त ठरलेल्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसत होते.