India vs New Zealand 2nd T20I:  क्रुणाल पांड्या याची चमकदार कामगिरी, 'हा' विक्रम रचणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज!
Krunal Pandya (Photo: Getty Images)

India vs New Zealand 2nd T20I: ऑकलंडमध्ये (Auckland) भारत विरूद्ध न्युझीलंड दुसरा T20 सामना सुरू आहे. वेलिंग्टनच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर आता भारतीय पुन्हा नव्या जोशात मैदानात उतरली आहे. या सामन्यामध्ये कृणाल पांडेने दमदार कामगिरी केली आहे. न्युझीलंडचा कॅप्टन केन विल्यम, कॉलिन मुर्नो आणि डॅरिल मिचेल यांना आऊट करून सामन्यामध्ये 3 विकेट्स कमावत इतिहास रचला आहे.

परभवाचा वचपा घेण्यासाठी भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. न्युझीलंड रोखण्यासाठी भारताने कमाल कामगिरी केली. एकाच सामन्यात तीन विकेट्स घेत T20 सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान कृणाल पांडेकडे गेला आहे. कृणाल अवघ्या 27 वर्षांचा आहे. 8 टी 20 मॅचेसमध्ये त्याने ही कमाल कामगिरी केली आहे. आजतागायत टी 20 प्रकारातील सामन्यांमध्ये सर्वाधिक 2 विकेट्स गोलंदाजांनी घेतल्या आहेत मात्र कृणालने ऑकलंडमध्ये न्युझीलंडच्या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (India vs New Zealand 1st T20I: न्युझीलंड संघाकडून भारत 80 धावांनी पराभूत; न्युझीलंडची मालिकेत 1-0 ने सरशी )

न्युझीलंडने भारतासमोर 159 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. टॉस जिंकत न्युझीलंड संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. न्युझीलंडच्या एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने जिंकत ऑस्ट्रेलिया पाठोपाठ न्युझीलंडमध्येही विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.