India vs Bangladesh | File Photo

भारत अणि बांगलादेश हे संघ एशिया कप २०१८ च्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा सामना २८ सेप्टेम्बरला दुबई येथे रंगणार आहे. ह्या आधी हे संघ २०१६च्या एशिया कपच्या अंतिम सामन्यात भिडले होते. भारताने आतापर्यंत ह्या टूर्नामेंटमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात hongkong विरुद्ध विजयासाठी संघर्ष करणार्य भारताने नंतर चांगलीच मुसंडी मारली. पारंपरिक प्रतिस्स्पर्धी पाकिस्तानला भारताने दोनदा नमवले असून बंग्लादेश्ला सुद्धा धूळ चार्ली आहे.

दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा अंतिम सामन्याचा प्रवास हा खडतर राहिला आहे. श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात बंग्लादेशने नमवले. पण त्या नंतर अफ़ग़ानिस्तान आणि भारताने पराभूत केले. पण महत्वाच्या सामन्यात बंग्लादेशने पाकिस्तानचा ३७ धावांनी धुव्वा उडवला. गेल्या दोन वर्षात बांग्लादेश खुप चांगला खेळला असून, एशिया कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

भारतासाठी रोहित शर्मा अणि शिखर धवन ही सलामीची जोडी चांगली खेळते आहे. मधल्या फळीत अम्बाती रायडू अणि दिनेश कार्तिक चांगली कामगिरी करत असून, फक्त महेंद्र सिंह धोनीची फलंदाजी हा त्रासदायक विषय आहे. धोनीला आता पर्यंत सूर गवसलेला नसून तो धावांसाठी झगडत आहे. पण आपल्या सर्वांना माहित आहेच की, धोनी हा कुठल्याही कपच्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करतोच करतो.

गोलंदाजी मध्ये जसप्रीत बुम्राह आणि भुवनेश्वर कुमार हे समोरच्या फलंदाजाना जास्त टिकू देत नाही आहेत. केदार जाधव, रविन्द्र जडेजा, युज्वेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे सुद्धा चांगल्या फॉर्मेट आहेत.

दुसरीकडे बांगलादेशची सलामी जोड़ी धावांसाठी आसुसलेली आहे. आधीच शकीब अल हसंच्या माघारीमुले मधली फली ही दुबली झाली आहे. पण, कर्णधार मशरफे मोर्तज़ा, मुस्ताफिजुर रहमान आणि मेहदी हसन हे भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यांना महामादुल्लाह आणि रूबल होस्सैनची चांगली साथ लाभु शकते.

भारत बंग्लादेश्ला कमी लेखु शकत नहीं हे आपल्याला माहितच आहे. उद्याचा सामना हा अत्यंत चुर्शिचा होइल हयात शंकाच नाही आहे.