India vs Australia T20I: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या T20I सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघाची विजयी सलामी
INDvsAUS

India vs Australia T20I 2019: ऑस्ट्रेलियामध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे संघ पुन्हा भारतामध्ये एकमेकांविरुद्ध लढायला सज्ज झाले आहेत. विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा रंगलेल्या पहिल्या T20I सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली आहे.  भारतावर 3 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासमोर भारताने 127  धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली. पण शेवटच्या क्षणी मॅच फिरली.

सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 126 धावा केल्या. लोकेश राहुलचे अर्धशतक आणि महेंद्रसिंग धोनी नाबाद 29 धावांवर होता.  ऑस्ट्रेलियाचे 2 बॉलवर 2 गडी बाद झाले. मॅक्सवेलने अर्धशतक झळकावत संघाला सावरलं. जसप्रीत बुमराहने लागोपाठ दोन बॉलवर दोन जणांना आउट करत आपली कमाल दाखवली. शेवटच्या क्षणी अटीतटीची झालेली मॅच फिरवली.

 

आज सामना सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले होते.पुढील सामना 27 फेब्रुवारी दिवशी बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे.  त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे.