रिद्धिमान साहा (Photo Credits: ANI)

पत्रकार वाद प्रकरणी भारतीय संघाचा (Indian Team) दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा  (Wriddhiman Saha) याने मौन तोडले आहे. भारताचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज साहाने मंगळवारी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या पत्रकाराची ओळख उघड न करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या ट्विटरवर सलग तीन ट्विट केले आणि त्यानंतर त्याच्याकडून एक धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. साहा म्हणाला की संदेशांमुळे तो दुखावला गेला आणि नाराज झाला, परंतु मानवतेच्या  (Humanity) आधारावर पत्रकाराचे नाव सार्वजनिकपणे उघड करणार नाही. तो म्हणाला, “यामुळे मी दु:खी आणि दुखावलो गेलो. असे वागणे खपवून घेतले जाऊ नये असे मला वाटले आणि अशा धमक्यांना कोणी सामोरे जावे असे मला वाटत नव्हते. मी ठरवले आहे की मी चॅट लोकांसमोर उघड करीन, परंतु त्याचे नाव उघड करणार नाही.” (Ravi Shastri On Wriddhiman Saha: रिद्धिमान साहाला धमकी, संतापलेल्या रवी शास्त्रींनी बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांच्याकडे केली ही मागणी)

ट्विटद्वारे साहाने असा इशारा दिला आणि म्हटले की अशी घटना पुन्हा घडल्यास तो मागे हटणार नाही, तसेच या कठीण काळात सर्वांच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले. साहाने असेही सांगितले की ज्या व्यक्तीने त्याला धमकी दिली त्याचे नाव उघड करण्यात मला स्वारस्य नाही आणि हे समजते की यामुळे त्याची/तिची प्रतिष्ठा व कारकीर्द खराब होऊ शकते. “मी कोणाचेही करिअर संपवण्याइतपत कोणाचेही नुकसान करू शकेन माझा स्वभाव असा नाही. त्यामुळे त्याच्या/तिच्या कुटुंबाकडे पाहत, माणुसकीच्या कारणास्तव मी सध्या नाव उघड करत नाही. पण अशी काही पुनरावृत्ती झाल्यास , मी मागे हटणार नाही.” 37 वर्षीय साहाला श्रीलंकाविरुद्ध आगामी कसोटी मालिकेतसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले.

यापूर्वी, साहाने ट्विटरवर आरोप केला होता की एका ‘सन्मानित’ पत्रकारला त्याने मुलाखत देण्यास नकार दिल्यानंतर आक्रमक शब्द वापरले. “भारतीय क्रिकेटमधील माझ्या सर्व योगदानानंतर.. मला एका तथाकथित ‘आदरणीय’ पत्रकाराकडून या गोष्टीचा सामना करावा लागतो! पत्रकारिता इथेच गेली,” साहा यांनी ट्विट केले होते. या वादानंतर माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने सर्वप्रथम तिखट प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आकाश चोप्रा ते माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री देखील साहाच्या समर्थनास पुढे सरसावले.