IND vs SL (Photo Credit - Twitter)

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) संघ रविवारी (17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) अंतिम फेरीत आमनेसामने येतील, तेव्हा त्यांच्याकडे आणखी एक आशिया चषक विजेतेपद मिळविण्याकडे लक्ष असेल. आशिया चषकाच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत नवव्यांदा आमनेसामने येणार आहेत. आत्तापर्यंत भारताने सर्वाधिक 7 वेळा आशिया चषक तर श्रीलंकेने 6 वेळा जिंकला आहे. आशिया चषक 2023 मध्ये या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने अपराजित राहून फायनलमध्ये प्रवेश केला आणि 5 पैकी 4 सामने जिंकले तर पाकिस्तान विरुद्धचा गट सामना पावसामुळे वाहून गेला.

दुसरीकडे. श्रीलंकेने 5 पैकी 4 सामने जिंकून दोन गट सामने आणि दोन सुपर-4 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली. या संपूर्ण स्पर्धेत श्रीलंकेचा संघ आतापर्यंत केवळ भारताकडूनच हरला असून आता पुन्हा एकदा फायनलमध्ये टीम इंडियाचे आव्हान असेल. (हे देखील वाचा: IND vs SL Asia Cup 2023 Final: आशिया चषक फायनवर पावसाचे संकट, सामना रद्द झाला तर कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या समीकरण)

आतापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये 166 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाने 97 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत, 11 सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत राहिला. तर एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत 20 सामन्यांपैकी भारताने 11 तर श्रीलंकेने 9 सामने जिंकले आहेत. भारताविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या 65 एकदिवसीय सामन्यांपैकी श्रीलंकेने 30 तर भारताने 29 जिंकले आहेत, तर 6 सामन्यांचा निकाल लागला नाही.

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका आतापर्यंत 8 वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने 5 तर श्रीलंकेने 3 जिंकले आहेत. भारताने 1984, 1988, 1990, 1995 आणि 2010 मध्ये आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते, तर श्रीलंकेने 1997, 2004, 2008 मध्ये आशिया कप फायनलमध्ये भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

शेवटच्या 8 लढतींमध्ये कोण कोणावर पडले भारी?

  • 1984 आशिया कप फायनल: भारताने राऊंड रॉबिन स्वरूपाच्या आधारे स्पर्धा जिंकली
  • 1988 आशिया कप फायनल: भारताने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला
  • 1990 आशिया कप फायनल: भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला
  • 1995 आशिया कप फायनल: भारताने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला
  • 1997 आशिया कप फायनल: श्रीलंकेने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला
  • 2004 आशिया कप फायनल: श्रीलंकेने भारताचा 25 धावांनी पराभव केला
  • 2008 आशिया कप फायनल: श्रीलंकेने भारताचा 100 धावांनी पराभव केला
  • 2010 आशिया कप फायनल: भारताने श्रीलंकेचा 81 धावांनी पराभव केला