भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवारी अहमदाबादमधील नरेंद मोदी स्टेडियमवर (Narend Modi Stadium in Ahmedabad) होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 च्या 12 व्या सामन्यापूर्वी सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील तीन मोठे कलाकार परफॉर्म करणार आहेत. बॉलिवूडचा दमदार आवाज अरिजित सिंग (Arijit Singh) या शोचा एक भाग असणार आहे. अरिजितसोबत शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि सुखविंदर सिंगही (Sukhwinder Singh) परफॉर्म करणार आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी परफॉर्म करणाऱ्या कलाकारांची माहिती दिली. (हे देखील वाचा: IND vs PAK World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी अहमदाबादला छावणी, सात हजार पोलिस आणि चार हजार होमगार्ड तैनात)
दुपारी 12.30 वाजल्यापासून कलाकार करणार परफॉर्म
बीसीसीआयने एक्सवर अरिजित, शंकर महादेवन आणि सुखविंदर यांचा फोटो शेअर केला आहे. शनिवारी दुपारी 12.30 वाजल्यापासून हे कलाकार परफॉर्म करणार आहेत. सामनापूर्व कार्यक्रम नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाईल. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातून चाहते आले आहेत. या सामन्याची तिकिटे खूप आधी विकली गेली होती.
Sukhwinder Singh is ready to make the occasion even more special! 🎵
Catch his sensational performance before the start of the #INDvPAK game on 14th October 🙌
Witness it LIVE at The Narendra Modi Stadium in Ahmedabad, starting at 12:30 PM 👌#CWC23 pic.twitter.com/beAHOMOfnZ
— BCCI (@BCCI) October 12, 2023
🎶 Catch Shankar Mahadevan LIVE before the big match at The Narendra Modi Stadium in Ahmedabad, setting the stage for #INDvPAK like never before! 🙌
Experience the pre-match show at the largest cricket ground in the world on 14th October, starting at 12:30 PM!#CWC23 pic.twitter.com/WMYRx0mR08
— BCCI (@BCCI) October 12, 2023
Kickstarting the much-awaited #INDvPAK clash with a special performance! 🎵
Brace yourselves for a mesmerising musical special ft. Arijit Singh at the largest cricket ground in the world- The Narendra Modi Stadium! 🏟️
Join the pre-match show on 14th October starting at 12:30… pic.twitter.com/K6MYer947D
— BCCI (@BCCI) October 12, 2023
क्रिकेट चाहत्यांसाठी माहिती
प्रेक्षक सकाळी 10 वाजल्यापासून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश करू शकतात.
सामनापूर्व कार्यक्रम 12:30 वाजता सुरू होईल.
प्रेक्षक स्टेडियममध्ये पर्स, मोबाईल फोन, कॅप आणि औषधे सोबत घेऊन जाऊ शकतात.
गुजरात क्रिकेट असोसिएशन आत वैद्यकीय आणि मोफत पाण्याची व्यवस्था करेल.
अहमदाबादमध्ये कडक सुरक्षा
अहमदाबादमधील या हायप्रोफाईल मॅचसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेसाठी 11 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तानचे संघ अहमदाबादला पोहोचले असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. तथापि, जर आपण एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रमांबद्दल बोललो तर पाकिस्तानचा वरचष्मा राहिला आहे. 134 पैकी 73 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 56 सामने जिंकले आहेत. भारतीय संघ विश्वचषकात आपली विजयी घोडदौड कशी कायम ठेवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.