Australia National Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना पर्थ (Perth Test) येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 295 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पर्थमधील या विजयानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. या सामन्यातील पराभवानंतर यजमान ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान झाले आहे. (हे देखील वाचा: India Beat Australia 1st Test Scorecard: पर्थ कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, कांगारुचा 295 धावांनी केला पराभव; जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर)
भारत पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर
ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. यापूर्वी टीम इंडियाला न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या अंतिम गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरली होती. याशिवाय भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आला होता, मात्र आता पुन्हा कांगारू संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
India return to the top of the WTC Points Table! 🔝🇮🇳#CricketTwitter #AUSvIND pic.twitter.com/zEUayED3vs
— Sportskeeda (@Sportskeeda) November 25, 2024
श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या-चौथ्या स्थानावर
पर्थ कसोटीनंतर टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 61.11 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 57.59 राहिली आहे. उर्वरित संघ अजूनही आपापल्या जागेवरच आहेत. श्रीलंका 55.56 टक्के विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंड 54.55 टक्के विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
भारताने मालिकेत घेतली 1-0 अशी आघाडी
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 150 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 104 धावांत आटोपला. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 487 धावा केल्या होत्या. भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने 161 धावा, विराट कोहलीने 100 धावा आणि केएल राहुलने 77 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात 238 धावांत गारद झाला. आता टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे.