पुणे: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना (IND vs ENG 4th T20I 2025) आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला गेला. चौथ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लडंचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह पाच पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ 19.3 षटकात 166 धावा करु शकला.
4TH T20I. India Won by 15 Run(s) https://t.co/RmBLGBKcGd #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 31, 2025
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात दोन धक्के लागले. साकिब महमूदने संजू सॅमसन (1) आणि तिलक वर्मा (0) यांना बाद केले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाकिबने सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तिलकनंतर सूर्यकुमारलाही खाते उघडता आले नाही. सलामीवीर अभिषेक शर्मा 19 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. रिंकू सिंगने 26 चेंडूत 30 धावा केल्या. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने 30 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली आणि शिवम दुबेने 53 धावांची शानदार खेळी केली. यासह भारताने इंग्लंडला विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य ठेवले.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाज साकिब महमूदने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून साकिब महमूदने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. साकिब महमूद व्यतिरिक्त जेमी ओव्हरटनने 2, ब्रायडन कार्से आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ 20 षटकात 166 धावा करु शकला. इंग्लंडने बेन डकेट आणि फिल सॉल्टच्या मदतीने चांगली सुरुवात केली. भारताला सहाव्या षटकात पहिले यश मिळाले. बेन डकेट 19 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. सलामीवीर फिल सॉल्टला २१ चेंडूत फक्त २३ धावा करता आल्या. अक्षरने त्याला क्लीन बोल्ड केले. कर्णधार जोस बटलरला फक्त दोन धावा करता आल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने 9 धावा केल्या. हॅरी ब्रुकने अर्धशतक झळकावले. त्याने बेथेलसोबत पाचव्या विकेटसाठी 19 चेंडूत 34 धावांची भागीदारी केली. 26 चेंडूत 51 धावा करून ब्रूक बाद झाला. त्याच्या या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. सुंदरने ब्रूक आणि नंतर कार्सना बाहेर काढले. इंग्लंडकडून साकिब महमूदने 35 धावांत तीन विकेट्स घेतल्या.