आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) तारखा जाहीर केल्या आहेत. 31 ऑगस्टपासून ही स्पर्धा पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) येथे होणार आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी होणाऱ्या या स्पर्धेत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे लागल्या आहेत. ज्याची करोडो चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाकिस्तान सामना कोणत्या तारखेला होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण त्याची वाट पाहत असलेल्या चाहत्यांना आम्ही एक मोठी बातमी देणार आहोत. खरे तर आशिया चषकादरम्यान दोन्ही देशांमधील थरारक स्पर्धा एकदा नव्हे तर तीनदा पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल.
भारत-पाकिस्तान येवु शकतात तीनदा आमने-सामने
खरे तर आशिया चषक स्पर्धेत सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळतील, अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना ग्रुप स्टेजमध्ये पाहायला मिळणार आहे. दोघांमधील हा सामना अधिकृतपणे फिक्स आहे. याशिवाय ग्रुप स्टेजनंतर सुपर 4 चे आयोजन केले जाईल. ज्यामध्ये सर्व संघ टॉप-2 मध्ये राहण्यासाठी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतील, अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना येथे पाहायला मिळेल. (हे देखील वाचा: Andy Roberts on Team India: 'भारतीय क्रिकेटपटूंना अहंकार चढलाय'; वेस्ट इंडीजच्या माजी दिग्गज खेळाडूने भारतीय संघावर केली टीका)
दोघांमधील तिसरा सामना अंतिम मानला जाऊ शकतो
दुसरीकडे, सुपर-4 जिंकून भारत आणि पाकिस्तानचे संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर या दोघांमधील तिसरा सामना अंतिम मानला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यातील तीनवेळा झालेल्या सामन्याचा थरार चाहत्यांना पाहायला मिळू शकतो.