जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघावर (Team India) सातत्याने टीका होत आहे. वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज सर अँडी रॉबर्ट्सने (Andy Roberts) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघावर टीका केली आहे. अँडी रॉबर्ट्सचे मत आहे की भारत त्यांच्या कामगिरीवर व्यावहारिकदृष्ट्या खूप गर्व आणि अतिआत्मविश्वास दाखवत आहे. आयपीएल विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट या मुद्द्यावर ते म्हणाले की, चर्चा अजून संपलेली नाही. भारताला आपले प्राधान्यक्रम लक्षात घेऊन त्यावर काम करावे लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रॉबर्ट्स पुढे म्हणाले की, भारताने जगातील उर्वरित खेळाडूंना कमी लेखले आहे. कसोटी क्रिकेट किंवा मर्यादित षटकांचे क्रिकेट कशावर केंद्रित आहे हे भारताला ठरवायचे आहे.
भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण...
अँडी रॉबर्ट्स यांनी 1970 आणि 1980 च्या दशकातील वेस्ट इंडिजच्या धडक गोलंदाज आहेत. अँडी रॉबर्ट्स यांनी म्हटलं आहे की, "भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण त्यांनी देशाबाहेर चांगली कामगिरी केलेली नाही. मला अपेक्षा होती की भारताने त्यांचे फलंदाजीतील पराक्रम दाखवावे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या अंतिम फेरीत मला कोणतेही चमकदार स्पॉट्स दिसले नाहीत. अजिंक्य रहाणेने कठोर संघर्ष केला असला तरी त्याच्या हाताला दुखापत झाली. शुभमन गिल जेव्हा ते शॉट्स खेळतो तेव्हा तो चांगला खेळतो. पण तो लेग स्टंपवर उभा राहतो आणि अनेकदा चेंडू स्टम्पवर टाकला जातो किंवा विकेटच्या मागे त्याचा झेल घेतला जातो." (हे देखील वाचा: WTC Final 2023 च्या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार Rohit Sharma कुटुंबासोबत सुट्टीचा घेत आहे आनंद, पहा फोटो)
अश्विनला वगळ्याबद्दल केलं आश्चर्य व्यक्त
रॉबर्ट्स यांनी पुढे सांगितलं, "त्याचे (विराट कोहली) शॉट्स चांगले आहेत, पण त्याने चेंडूच्या मागे जायला हवं. भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, पण ते विश्वसनीय नाहीत. दौऱ्यावर त्यांनी चांगली कामगिरी केलेली नाही." भारताचा टॉप ऑर्डरचा कसोटी गोलंदाज आणि अव्वल ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला वगळल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. "अश्विनला वगळणं हास्यास्पद होतं. तुम्ही तुमचा सर्वोत्तम स्पिनर कसा निवडू शकत नाही?", असं रॉबर्ट्स यांनी म्हटलं आहे.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडिया 296 धावांत आटोपली
भारतीय क्रिकेट संघाला नुकतेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 296 धावांवरच गारद झाला.