ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Final 2023) ची अंतिम फेरी हरल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याचवेळी रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. याआधीही रोहित शर्मा पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे. त्याची फोटोही भारतीय कर्णधाराने इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनलमध्ये 209 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची आणि पराभूत होण्याची टीम इंडियाची ही दुसरी वेळ होती. तत्पूर्वी, भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभव झाला होता. (हे देखील वाचा: R Ashwin On WTC Final 2023: 'मला खेळायचे होते...', डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल अश्विनने मौन सोडले; सांगितले संपूर्ण सत्य)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)