India Women's National Cricket Team vs Ireland Women's National Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ (IND W vs IRE W) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज 10 जानेवारी रोजी राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात, आयर्लंड महिला संघाची कर्णधार गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे भारतीय महिला संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंड महिला क्रिकेट संघाला चौथा धक्का बसला आहे. प्रिया मीश्राच्या बॉलवर लॉरा डेलानी शून्यावर बाद झाली. सारा फोर्ब्स, उना रेमंड-होई,ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी या धावबाद झाल्या आहे. बातमी लिहिताना, आयर्लंडचा स्कोअर 59 (4 विकेट, 15 षटके) होता. (India Women vs Ireland Women, 1st ODI Match Live Streaming In India: टीम इंडियाविरुद्ध आयर्लंड महिला आमनेसामने; कधी, कुठे आणि कसा पहाल सामना?)
आयर्लंड महिला क्रिकेट संघाला चौथा धक्का
After choosing to bat first, Ireland Women have found themselves in big trouble in the first WODI at Rajkot.
🇮🇪 58/4 (14).
Skipper Gabi Lewis is fighting a lone battle 24*.
Priya Mishra got back to back wickets to dent Ireland further.#INDWvsIREW pic.twitter.com/TdOY9Lqznp
— Cricket.com (@weRcricket) January 10, 2025
दोन्ही संघांतील खेळाडू
टीम इंडिया: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, मिन्नू मणी, रिचा घोष, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, तितस साधू, साईमा ठाकोर.
आयर्लंड: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, लॉरा डेलानी, लिया पॉल, ओर्ला प्रेंडरगास्ट, उना रेमंड हॉय, अर्लीन केली, जॉर्जिना डेम्पसे, एमी मॅग्वायर, फ्रेया सार्जंट, अलाना डालझेल.