Womens Team India (Photo Credit - Twitter)

श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. आज या स्पर्धेतील दहावा सामना भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि नेपाळ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

पाहा पोस्ट -

टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 178 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शफाली वर्माने 81 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. नेपाळकडून सीता राणा मगरने सर्वाधिक दोन बळी घेतले होते.

भारताने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नेपाळचा डाव हा पहिल्यापासून सावरला नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांना सातत्याने धक्के दिले. भारताकडून दिप्ती शर्माने 3 विकेट घेतल्या तर राधा रेड्डी आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. निर्धारीत 20 षटकांत 96 धावां केल्या. भारताने या सामन्यात 82 धावांनी विजय प्राप्त केला. शेफाली वर्मा या सामन्यात सामनाविर ठरली.