IND vs WI Series 2022: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) 6 फेब्रुवारीपासून टीम इंडिया (Team India) व्हाईट बॉल मालिकेने होम सीझनला सुरुवात करणार आहे. भारतीय संघ (Indian Team) मायदेशात वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि जूनमध्ये दक्षिण आफ्रिका यांचा पाहुणचार करेल. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे भारताला चालना मिळेल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या निराशाजनक पराभवानंतर संघात काही बदल अपेक्षित आहेत. काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, तर काही खेळाडूंना Protes मध्ये त्यांच्या कामगिरीसाठी वगळले जाऊ शकते. स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार भारताचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन (Rishi Dhawan) तब्ब्ल 6 वर्षांनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. 2016 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियात पदार्पण केलेल्या ऋषीने 3 वनडे आणि 1 टी-20 खेळला आहे. 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला पहिली संधी मिळाली होती आणि त्या वर्षी तो झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. (IND vs WI 2022 Series: भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजशी टीम इंडिया करणार दोन हात, असे आहे मर्यादित षटकांचे संपूर्ण Schedule)
ऋषीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीचे फळ म्हणून राष्ट्रीय संघात पुन्हा संधी दिली जाईल. ऋषीने विजय हजारे ट्रॉफी 2021/22 मध्ये धावांचा डोंगर उभारला आणि त्याला या खेळीचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेत हिमाचल प्रदेशला पहिले विजेतेपद मिळवून देण्याव्यतिरिक्त ऋषी खेळाच्या दोन्ही विभागात चमकला. त्याने 458 धावा केल्या आणि 17 विकेट घेतल्या. वरिष्ठ अष्टपैलू खेळाडूने आपल्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधले आणि मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी भविष्यात निवडीसाठी विचार केला जाईल असे सांगितले होते. दरम्यान, हार्दिक पांड्या अद्याप निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 पासून तो राष्ट्रीय संघापासून दूर आहे. व्यंकटेश अय्यरने त्याच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले पण आता अय्यरच्या अपयशामुळे आता ऋषीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशातील मालिकेतील 3 वनडे सामने अनुक्रमे 6, 9 आणि 11 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळले जातील तर 3 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने 16, 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे खेळले जाणार आहेत. देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता बीसीसीआयने दोन्ही मालिका एकाच ठिकाणी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.