IND vs WI 3rd ODI: कटकमध्ये विराट कोहली याने जॅक कॅलिस यांना टाकले मागे, वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला 'हा' रेकॉर्ड
Virat Kohli (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) कटक मॅचमध्ये एका रेकॉर्डची नोंद केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज जॅक कॅलिस (Jacques Kallis) याना विराटने मागे टाकले. भारताकडून सर्वाधिक वनडे धावा करण्याच्या बाबतीत कोहली फक्त सचिन तेंडुलकर याच्या मागे आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघात आज कटकमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. करो-वा मारो सामना बनलेल्या या सामन्यात टीम इंडिया विजयाच्या प्रयत्नात आहे. मागील दोन्ही मॅचमध्ये विराट फलंदाजीत अपयशी असला तरीही यंदा तो चांगली बॅटिंग करत आहे. कोहलीला रन मशीन असे म्हणतात आणि त्यामागील कारण म्हणजे त्याच्या बॅटमध्ये सतत येत असलेल्या मोठ्या खेळी. आणि असेच काही आता विंडीजविरुद्ध झाले आहे. (IND vs WI 3rd ODI: रिषभ पंत याने सलग 3 कॅच सोडल्यावर Netizens ने उडवली खिल्ली, Uber चालवण्याचा दिला सल्ला, पाहा Tweets)

या मॅचपूर्वी विराट 11,524 धावांसह सर्वाधिक धावांच्या यादीत आठव्या क्रमांकावर होता. पण, 56 धावा करताच विराटने माजी आफ्रिकन जॅक कॅलिसला मागे टाकत सातवे स्थान मिळवले आहे. विराट कॅलिसच्या 11,579 धावांच्या पार गेला आहे. सचिन 18,424 धावा करुन पहिल्या स्थानावर आहे. इतकंच नाही तर 71 धावा करताच विराटने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. विराटने श्रीलंकाविरुद्ध सर्वाधिक 2,220 धावा केल्या आहेत. आणि आता एका विशेष टीमविरुद्ध म्हणून विराटने विंडीजविरुद्ध 2,221 धावांची नोंद केली आहे.

विंडीजविरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये टॉस गमवून पहिले फलंदाज करत त्यांनी भारताला विजयासाठी 316 धावांचे लक्ष्य दिले आहेत. निकोलस पुरन आणि किरोन पोलार्ड यांनी अर्धशतकी खेळी करत भारताविरुद्ध आव्हानात्मक स्कोर करण्यास महत्वाची भूमिका बजावली.