फलंदाज म्हणून युवा रिषभ पंत (Rishabh Pant) काही प्रमाणात फॉर्ममध्ये परतला असला तरी यष्टीरक्षक म्हणून अजूनही तो निराशाजनक प्रदर्शन करत आहे. आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात पंतने हद्दच केली. पंतने कटकमध्ये एकामागून एक तीन झेल सोडले. पंतने तिन्ही कॅच फिरकी गोलंदाजांविरूद्ध सोडले. पंतने रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याच्या लागोपाठ दोन चेंडूंवर आणि नंतर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या चेंडूवर एक झेल सोडला. विंडीजविरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताची आघाडीची फळी अपयशी झाली असल्यास पंतने श्रेयस अय्यर याच्या साथीने सांभाळून फलंदाजी करत डाव सावरला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातदेखील पंतने प्रभावी खेळी केली आणि भारताच्या 300 पेक्षा अधिक धावांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आणि टीकाकारांचे तोंड बंद केले. पंतच्या या कामगिरीचे चाहतेच नाही तर टीकाकारांनी देखील कौतुक केले होते. पण, तिसऱ्या वनडेत मात्र पंतने मोठ्या चुका केल्या आणि याचा फायदा घेत नेटिझन्सनी त्याला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली. (IND vs WI 3rd ODI: कटक वनडेमध्ये रोहित शर्मा याने मोडला सनथ जयसूर्या याचा 22 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड, बनला No 1 Opener)
कटकमधील सामन्यात पंतने 16 व्या षटकात पहिला झेल सोडला. कुलदीपच्या दुसर्या बॉलवर रोस्टन चेस याच्या बॅटचा बाहेरील बाजूस बॉल लागला, पण पंतला हा झेल पकडता आला नाही. पंत पंतच्या ग्लोव्हजमधून चेंडू सरकला. यानंतर पंतने जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या शिमरोन हेटमायर याचे एक नाही तर दोन कॅच सोडले. 25 व्या षटकात, जडेजाच्या दुसऱ्या चेंडूवर हेटमायरने लेग साईडला शॉट खेळला. चेंडू त्याच्या बॅटला लागून पंतकडे गेला, पण पंतचा झेल चुकला. यानंतर पुन्हा तसेच घडले, पुढच्या चेंडूवर हेटमायरने पुन्हा एकदा शॉट खेळला आणि चेंडू त्याच्या बॅटच्या बाजूला लागून विकेटकीपरकडे गेलं आणि पंतला पुन्हा झेल पकडता आला नाही. मात्र, हेटमायर 37 धावांच्या वैयक्तिक धावांवर नवदीप सैनी याच्या चेंडूवर बाद झाला. पंतच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे यूजर्सने एमएस धोनी याला संघात आणण्याची मागणी केली आहे, तर एकही त्याला विकेटकिपिंगसाठी अयोग्य मानतात. एकाने तर पंतला निवृत्तीनंत उबर टॅक्सी चालवण्याचाही सल्ला दिला.
पाहा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:
तो उबर ड्रायव्हर बनू शकतो
When #RishabhPant retires from cricket, he can become an Uber driver. He drops very well. #INDvsWI
— 🇮🇳Aryan Gupta (@Aryans_tweet) December 22, 2019
पंतने 5 झेल सोडले
5 catch dropped by Rishabh Pant not surprised why he is still in the team 🙌#INDvWI
— S (@ItsSaurabh_) December 22, 2019
एकाच सामन्यात 4 ड्रॉप कॅच विश्वास ठेवू शकतात का?
Can u believe 4 dropped catches in a single match. WI got about 50 tune extra due to this.
— Vivek Kumar Shiv 🔱 विवेक कुमार शिव (@VivekKumarShiv) December 22, 2019
भारताला याची किंमत मोजावी लागली
#rishabh pant drops vital catch off pooran. It cost india at the death.#droprishabhpant #INDvsWI
— Chetan Abdagire (@CAbdagire) December 22, 2019
प्रत्येक भारतीय चाहता जेव्हा जेव्हा या सामन्यात पंतला कॅच सोडतो...
Every Indian fan whenever rishabh pant drops catch in this match....... pic.twitter.com/m2KokOiqEm
— Monika Thakkar🇮🇳 (@MonikaThakkar10) December 22, 2019
पंतचा अंतिम निरोप
Rishabh Pant's final farewell. #INDvWI #RishabhPant pic.twitter.com/4Y0ERIxM4A
— Ajeet Kumar (@ajeet_kumar21) December 22, 2019
दरम्यान, पंतशिवाय जडेजाने देखील या मॅचमध्ये एक झेल सोडला. नवदीप सैनी च्या गोलंदाजीवर झेल सोडला. दुसरीकडे, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेत आजवर 18 झेल सोडले आहेत. या आकडेवारीवरून टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाची पातळी किती खालावली आहे हे समजते.