IND vs WI 2nd ODI: माइकल बेवनशी स्वतःची तुलना होण्यावर सूर्यकुमार यादवने दिली जबरदस्त प्रतिक्रिया, जाणून घ्या SKY काय म्हणाला
सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) काही उत्कृष्ट कामगिरीसह मधल्या फळीतील फलंदाज म्हणून राष्ट्रीय संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करत आहे. सूर्याने पदार्पणातच अर्धशतक झळकावून सर्वांना प्रभावित केले आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि ज्यामध्ये भारताच्या विजयात मालिकावीर ठरला. मात्र, त्याचा हा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. यादवच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे पाच महिन्यांसाठी तो क्रिकेटमधून बाहेर  राहिला, परंतु त्याने आशा सोडली नाही आणि त्याच्या जबरदस्त ब्रेकचा उपयोग स्वतःवर काम करण्यासाठी केला. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यर उपलब्ध नसल्यामुळे, सूर्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आणि त्याच्या नैसर्गिक खेळाला आळा न घालता धावांचा पाठलाग करताना त्याच्या संयमामुळे तो चर्चेत आला. (IND vs WI 2nd ODI Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कसे आणि कुठे पाहणार?)

पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर सूर्याला विचारले गेले की अनेकांनी त्याला माइकल बेवन  (Michael Bevan) म्हणण्यास सुरुवात केली आहे, जो 50 षटकांच्या खेळांमध्ये ऑस्ट्रेलियाचा (Australia) प्रमुख फिनिशर होता. या प्रश्नाने थोडे आश्चर्यचकित होऊन सूर्याने हसून उत्तर दिले, “सर, मी नुकतेच पाच किंवा कदाचित सात सामने खेळले आहेत. मला तूर्तास सूर्यकुमार यादवच राहू दे.” 31 वर्षीय फलंदाजाने पुढे सांगितले की संघाला कोणत्याही परिस्थितीतून सामना जिंकून देणे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. “मी कितीही नंबरवर फलंदाजी करू शकेन, मी कोणत्याही परिस्थितीत असलो, जर मी तिथून संघाला विजय मिळवून देऊ शकलो, तर त्याकडे माझे लक्ष असेल. पण मी नेहमी जसे आहे तसे निर्भय राहायचे आहे,” तो पुढे म्हणाला. उल्लेखनीय म्हणजे आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्या भारतासाठी चौथ्या क्रमांकाच्या वर फलंदाजी केली नाही.

विंडीजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्याबद्दल बोलायचे तर सूर्या त्याने 34 चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद 36 धावा करून नाबाद राहिला आणि झटपट विकेट गमावल्यानंतर त्याने नवोदित दीपक हुडा सोबत संयमाने फलंदाजी करून अखेरीस सामना जिंकून दिला.