
IND vs WI 2022 Series: क्रिकेट वेस्ट इंडिज (Cricket West Indies) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी भारताच्या वेस्ट इंडिज दौर्याची (India Tour of West Indies) घोषणा केली. टीम इंडिया (Team India) या दौऱ्यावर 22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असून दौऱ्याची सांगता 17 जुलै रोजी होईल. त्यानंतर निवडलेले खेळाडू थेट वेस्ट इंडिजला रवाना होतील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे खेळवले जातील. त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि सेंट किट्स अँड नेव्हिस येथे एकदिवसीय मालिका आणि तीन टी-20 आयोजित केले जातील, अंतिम दोन आंतरराष्ट्रीय सामने टी-20 यूएसए मधील फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा (Florida) येथे आयोजित केले जातील. (IND vs SA Series 2022: कर्णधार KL Rahul पुढे मोठे आव्हान, दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मोडणार टी-20 विश्वविक्रम?)
तीन एकदिवसीय सामने अनुक्रमे 22, 24 आणि 27 जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेनच्या (त्रिनिदाद आणि टोबॅगो) प्रतिष्ठित क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळले जातील आणि त्यानंतर पाच टी-20 सामने खेळले जातील. पहिला टी-20 ब्रायन लारा स्टेडियम (पोर्ट ऑफ स्पेन) येथे 29 जुलै रोजी आणि त्यानंतर अनुक्रमे 1 व 2 ऑगस्ट रोजी सेंट किट्स वॉर्नर पार्क येथे दोन सामने होणार आहेत. यांनतर अंतिम दोन सामने अमेरिकेच्या भारतीय डायस्पोरा पूर्ण करण्यासाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी फ्लोरिडा येथील ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियमवर आयोजित केले जातील. संपूर्ण मालिका केवळ FanCode वर लाइव्ह स्ट्रीम केली जाईल. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन आगामी मालिकेबद्दल म्हणाला, “आमच्याकडे एक तरुण संघ आहे जो क्रिकेटचा ब्रँड पुनर्संचयित करण्यासाठी उत्सुक आहे जो वेस्ट इंडिज संघ खेळण्यासाठी ओळखला जातो. उल्लेखनीय आहे की सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता लाइव्ह सुरु होतील तर टी-20 सामने रात्री 8 वाजता पाहायला मिळतील.
भारताच्या विंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
एकदिवसीय मालिका
पहिली वनडे: 22 जुलै (क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन)
दुसरी वनडे: 24 जुलै (क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन)
तिसरी वनडे: 27 जुलै (क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन)
आंतरराष्ट्रीय टी-20
पहिला टी-20: 29 जुलै: (ब्रायन लारा स्टेडियम, पोर्ट ऑफ स्पेन)
दुसरी टी-20: 1 ऑगस्ट (वॉर्नर पार्क, सेंट किट्स आणि नेव्हिस)
तिसरा टी-20: 2 ऑगस्ट (वॉर्नर पार्क, सेंट किट्स आणि नेव्हिस)
चौथी टी-20: 6 ऑगस्ट (ब्रॉवर्ड काउंटी ग्राउंड, फ्लोरिडा, यूएसए)
पाचवी टी-20: 7 ऑगस्ट (ब्रॉवर्ड काउंटी ग्राउंड, फ्लोरिडा, यूएसए)