IND vs WI 1st Test Day 1: रविचंद्रन अश्विन याला Playing XI मधून वगळल्याने भडकले नेटिझन्स, म्हणाले ही सर्वात 'विचित्र निवड'
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: AP/PTI)

भारतीय संघाचा (Indian Team) आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपसाठीचा प्रवास सुरु झाला आहे. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध टेस्ट मालिकेला आजपासून सुरुवात झाली. 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिल्या सामन्यात टॉस जिंकून विंडीजने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. टी-20 आणि वनडे मालिकेत संतोषजनक कामगिरी न केल्याने रोहित शर्मा याला टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. तर अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यालाही संधी देण्यात आलेली नाही. (IND vs WI 1st Test Day 1: विराट कोहली, मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद, Lunch पर्यंत भारत 3/68)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल, आयसीसीने (ICC) देखील याची पुष्टी केली. अश्विन पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनच्या भाग नसल्याचे जेव्हा चाहत्यांना कळले तेव्हा त्यांनी टीम इंडियाच्या सर्वात घातक गोलंदाजांची पाठराखण केली. काहींनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले तर काहींनी हा सर्वात विचित्र निवड असल्याचे नमूद केले. पहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया:

घृणास्पद निर्णय

आजचे प्लेयिंग इलेव्हन पाहून आश्चर्य वाटले

सर्वात वाईट संघ निवड

अश्विनला काढून टाकणे त्याच्या कारकीर्दीवरील ईर्ष्यासारखे दिसते...

2017 पासून टीम इंडियाच्या मर्यादित षटकांच्या संघात अश्विनचा विचार केला नव्हता. तेव्हापासून अश्विनने फक्त टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून राष्ट्रीय संघात आपली उपस्थिती जाणवून दिले आहे. अश्विन टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू ठरला आहे. 32 वर्षीय अश्विन हा भारतीचा वेगवान फिरकीपटू आणि टेस्ट सामन्यांमध्ये 200 विकेट घेणार दुसरा वेगवान भारतीय फिरकी गोलंदाज होता. अश्विनने 37 मॅचमध्ये हा टप्पा पार केला.