‘कर्णधार’ रोहित शर्मा आणि ‘लीडर’ विराट कोहली (Photo Credit: Twitter)

अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि वेस्ट इंडिज West Indies) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. विराट कोहली (Virat Kohli( आता कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा (Team India) कर्णधार नसल्यामुळे तो पहिल्यांदाच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळायला मैदानात उतरला आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहितला टी-20 पाठोपाठ एकदिवसीय संघाची देखील कमान सोपवण्यात आली. रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे Proteas दौऱ्यावर वनडे मालिकेतून बाहेर बसावे लागले होते त्यामुळे नियमित कर्णधार म्हणून प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या या एकदिवसीय सामन्यात कर्णधार आणि लीडर यांच्यातील ताळमेळ पाहायला मिळाला. (IND vs WI 1st ODI: ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर यांना टीम इंडियाची श्रद्धांजली, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले मैदानात)

मैदानावर रोहितची मैदानावर माजी कर्णधार कोहली सोबतची चांगली बॉन्डिंग समोर आली. टीम इंडिया जेव्हा क्षेत्ररक्षण करत होती तेव्हा कोहली सतत नव्या कर्णधारासोबत दिसत होता. यादरम्यान विराट त्याच्या उत्तराधिकार्‍याला मैदानात सेटिंगमध्ये मदत करताना दिसत होता, तसेच विराट कोहली गोलंदाजांनाही टिप्स देत होता. या संपूर्ण घटनेवरून स्पष्ट होते की, रोहित आता कर्णधार साला तरी विराट कोहलीही हा ‘लीडर’ आहे, ज्याचा उल्लेख त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. विराटने विंडीजविरुद्ध एका मुलाखतीत म्हणाला होता की तो आता कर्णधार नाही, पण याचा अर्थ असा नाही की तो ‘लीडर’ नाही आहे. एमएस धोनीप्रमाणे तो नेहमीच संघाला ‘लीडर’ म्हणून मदत करेल आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यातही ते दिसून आले. इतकंच नाही तर शमर्ह ब्रुक्सविरुद्ध DRS घेण्याच्या वेळी देखील रोहित शर्मा आणि रिषभ पंत सोबत विराट चर्चा करताना दिसला.

कोहली अजूनही नेता आहे

रोहित शर्माला DRS घेण्याचा सल्ला...

विराट कोहली आणि रोहित शर्माचे सेलिब्रेशन

नवा कर्णधार रोहितला विराटची साठी

लक्षात घ्यायचे की गेल्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 पूर्वी विराट कोहलीने या मेगा स्पर्धेनंतर T20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, परंतु एकदिवसीय आणि कसोटीमध्ये तो नेतृत्व करणे चालू ठेवेल. तथापि डिसेंबर 2021 मध्ये बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी त्याच्याकडून ODI चे कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यावर विराट कोहली कसोटी कर्णधार म्हणून पायउतार झाला.