राहुल द्रविड आणि पृथ्वी शॉ (Photo Credit: Instagram/PrithviShaw)

IND vs SL Series 2021: यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी 827 धावा करणारा भारताचा आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला अखेरीस श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) भारतीय संघात (Indian Team) कमबॅक केलं आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वी शॉने प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) बरोबर काम करण्याविषयी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती दिली आणि सांगितले की राहुल सर आहेत तर ड्रेसिंग रूममध्ये शिस्तीची अपेक्षा केली जाऊ शकते. श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनच्या युवा टीम इंडियाचे राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक आहेत. 13 जुलै रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघात एकदिवसीय सामन्यासह सहा सामन्यांच्या व्हाइट बॉल मालिका खेळली जाणार आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडिया 21 जुलैपासून टी -20 मालिका खेळणार आहे. (IND vs SL Series 2021: ‘भारताच्या 'द्वितीय श्रेणी' संघाचा पाहुणचार करणे अपमानजनक,’ श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजेता कर्णधाराने SLC ला फटकारले)

“राहुल सरांच्या खाली खेळण्याची एक वेगळ्या प्रकारची मजा आहे. ते आमचे अंडर-19 प्रशिक्षक होते. ते ज्या पद्धतीने बोलतात, त्यांचा कोचिंगचा अनुभव सामायिक करतात ते आश्चर्यकारक आहे. जेव्हा जेव्हा ते खेळाबद्दल बोलतात तेव्हा ते किती अनुभव आहे हे दर्शवतात. त्यांना क्रिकेटबद्दल सर्व काही माहित आहे. अटी आणि शर्तींवर ते ज्या प्रकारे बोलतात, ते या जगा पलीकडे आहे,” शॉने सोमवारी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. तसेच शॉने सहखेळाडूंना चेतावणी देत म्हटले की, “राहुल सर असल्याने ड्रेसिंग रूममध्ये शिस्तीची अपेक्षा असेल. मी राहुल सरांसोबतच्या सराव सत्रांची आतुरतेने वाट पाहत आहे कारण मला त्यांच्याशी तासन्तास बोलणे आवडते. हा (श्रीलंका) दौरा, मला फक्त संधी हव्या आहेत. मी भारतीय संघात परत येण्यास प्रयत्नशील होतो. मी टीमला नेहमीच माझ्या पहिले ठेवतो. मग ते भारत असो, रणजी करंडक संघ असो, क्लब असो वा माझी शाळा संघ. मला माझे सर्वोत्तम देण्याची इच्छा आहे,” 21 वर्षीय शॉ म्हणाला.

दरम्यान, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शॉला इंग्लंडला पाठवले जाऊ शकते, अशी अटकळ आहे.