IND vs SL Series 2021: ‘भारताच्या 'द्वितीय श्रेणी' संघाचा पाहुणचार करणे अपमानजनक,’ श्रीलंकेच्या वर्ल्ड कप विजेता कर्णधाराने SLC ला फटकारले
अर्जुना रणतुंगा (Photo Credit: Facebook)

IND vs SL Series 2021: भारताविरुद्ध 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या (Team India) दुसऱ्या श्रेणीच्या संघाचा पाहुणचार करणे अपमानजनक असल्याचे म्हणत श्रीलंकेचा (Sri Lanka) 1996 वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (Sri Lanka Cricket) फटकारले. यजमान श्रीलंका व भारतीय संघात (Indian Team) जुलै महिन्यात 3 सामन्यांची वनडे व टी-20 मालिका रंगणार असून नियमित कर्णधार विराट कोहली आणि मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये असल्याने भारताने शिखर धवनच्या नेतृत्वात कमी अनुभवी संघ पाठवला आहे. यात सहा खेळाडू आहेत ज्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. (India vs Sri Lanka: भारतीय संघाचा क्‍वारंटाईन कालावधी पूर्ण; BCCI ने शेअर केला खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद)

दोन वर्षांपूर्वीपर्यंत सरकारमध्ये मंत्री असलेले माजी कर्णधार रणतुंगा यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले, “हा दुसरा दर्जाचा भारतीय संघ आहे आणि त्यांचे येथे येणे आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. मी टेलिव्हिजन मार्केटिंगच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्याबरोबर खेळण्याचे मान्य केल्याबद्दल मी सध्याच्या प्रशासनाला दोष देतो.” श्रीलंकेच्या 1996 विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार म्हणाले की, “भारताने आपला सर्वोत्कृष्ट संघ इंग्लंडला पाठवला आणि येथे कमकुवत संघात पाठवला आहे. मी यासाठी मंडळाला दोष देतो.” दरम्यान, धवनच्या भारतीय संघाने नुकताच आपला अनिवार्य आयसोलेश कालावधी पूर्ण केले असून 13 जुलैला पहिला वनडे खेळणार आहे. माजी भारतीय कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड हे संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

भारताने पहिल्यांदाच जगाच्या वेगवेगळ्या भागात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संघांच्या रूपात खेळण्यासाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा अनुभवी सलामी फलंदाज धवनला पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली असून ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार आहे. कोहली आणि रोहित व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, केएल राहुल आणि रिषभ पंत देखील इंग्लंडमधील भारतीय कसोटी संघात आहेत. दुसरीकडे, धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघात हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्यासह देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, चेतन सकारिया असे काही नवे चेहरे आहेत.