श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना बंगळुरूच्या (Bangalore) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दिवस/रात्र कसोटीत बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकूण 16 विकेट पडल्या यावरून याचा अंदाज लावता येतो. मात्र, या अवघड खेळपट्टीवर भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) फलंदाजी सोपी करून दाखवली. सर्व फलंदाज स्वस्तात बाद होत असताना अय्यरने 98 चेंडूंत 10 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांसह 92 धावा फडकावत संघाला 252 धावांपर्यंत नेले पोहचवले. यादरम्यान त्याचे दुसरे कसोटी शतक हुकले. सामन्यादरम्यान आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या अय्यरने सामन्यानंतरच्या आपल्या वक्तव्याने मने जिंकली. (IND vs SL Pink-Ball Test Day 2 Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यात दिवस/रात्र कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कसे पाहणार?)

शनिवारी बंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या गुलाबी कसोटी सामन्यात श्रेयसला त्याच्या दुसऱ्या कसोटी शतकापासून 8 धावा कमी पडल्या. अय्यरने आपल्या 92 धावांच्या खेळीवर सांगितले की त्याला चेंडूचा बचाव करताना बाहेर पडायचे नव्हते कारण धावा करण्यापेक्षा अशा प्रकारे बाद होण्याची शक्यता जास्त होती. “जेव्हा मी आत बसलो होतो, तेव्हा सगळीकडे नाट्य घडत होते आणि रोमांच तीव्र होता. मला चेंडूचा बचाव करताना बाहेर पडायचे नव्हते कारण धावा करण्यापेक्षा अशा प्रकारे बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते,” अय्यरने प्रसारकांना सांगितले. “जरी मी चेंडूवर फ्लॅश केला तरी तो सुरक्षितपणे सोडावा लागतो. माझ्या मनात शतक नव्हते, एकदा मी 80 शीत पोहोचलो की, जस्सी (बुमराह) बॉलचा खरोखर चांगला बचाव करत होता आणि मला कधीच वाटले नाही की मला 5व्या-6व्या चेंडूवर एकेरी धाव घ्यावी लागेल,” अय्यर पुढे म्हणाला.

दुसरीकडे, आपले दुसरे कसोटी शतक हुकल्याबद्दल श्रेयस म्हणाला की, “हा खेळाचा एक भाग आहे. आजचा दिवस माझा नव्हता आणि मला पश्चात्ताप नाही. जेव्हा चेंडू नवीन होता तेव्हा तो स्विंग आणि सीमिंग खूपच चांगला होता. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये चर्चा केली की वेगवान गोलंदाज खूप मोठी भूमिका बजावणार आहेत आणि आम्ही तेच पाहिले.” दरम्यान, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारत आतापर्यंत 166 धावांनी आघाडीवर आहे.