IND vs SL 2nd Test: टीम इंडिया विजयरथावर स्वार, तर अश्विन याचा दक्षिण आफ्रिदी दिग्गजला ‘440 वा’ धक्का; पहा सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd Test: बेंगळुरू (Bangalore) येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात भारताने (India) श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव केला. यासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा क्लीन स्वीप केला आहे. बेंगलोर कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) आपली फलंदाजी आणि गोलंदाजीने वर्चस्व कायम ठेवले होते. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे भारताच्या या विक्रमी विजयाचे नायक ठरले. पंत आणि अय्यर यांनी संघ अडचणीत असताना आपल्या आक्रमक फलंदाजीने संघाचा मोर्चा सांभाळला तर बुमराहच्या नेतृत्वात गोलंदाजांनी श्रीलंका (Sri Lanka) गोलंदाजांवर हल्ला चढवला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काही महत्वपूर्ण रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SL Pink-Ball Test: मायदेशात टीम इंडियाचा धमाका, श्रीलंकेला व्हाईट-वॉश देत घरच्या मैदानावर सलग 15वी कसोटी मालिका जिंकली)

1. रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 8 वा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. अश्विनने बेंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा फलंदाज धनंजया डी सिल्वाला बाद करून 440वी विकेट एलिट यादीत डेल स्टेनला मागे टाकले.

2. गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

3. भारताचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजा याने श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला अवघ्या एका धावेवर माघारी धाडलं. श्रीलंका दिग्ग्ज फलंदाजाला जडेजाने बाद करण्याची ही 8 वी वेळ ठरली.

4. टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करून एका मोठ्या ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली, जी 90 वर्षात प्रथमच होईल. 90 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध बेंगळुरू येथे गुलाबी कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आणि पहिल्यांदा सलग दोन किंवा अधिक फॉरमॅट मालिकेत दोन संघांविरुद्ध क्लीन-स्वीपचा केला. श्रीलंका मालिकेपूर्वी टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत 3-0 आणि एकदिवसीय मालिकेत 3-0 ने विजय मिळवला होता.

5. भारताने श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव करत मालिका 2-0 ने मालिका क्लीन स्वीप केली. हा भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग 15 वा कसोटी मालिका विजय ठरला आहे. भारताने नोव्हेंबर 2012 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. मात्र, त्यानंतर टीम इंडियाने देशात एकही मालिका गमावली नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर एकाही संघाला घरच्या मैदानावर अशी कामगिरी करता आली नाही.

6. बेंगलोर कसोटी सामन्यात विजयासह भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात विजयाची मालिका सुरु ठेवली आहे. भारतात दोन्ही संघ आतापर्यंत 22 कसोटी सामने खेळले असून यजमानांनी 13 वेळा यशाची चव चाखली आहे, तर नऊ सामने अनिर्णित राहिले आहेत.