IND vs SL 2nd T20I 2021: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कोलंबो (Colombo) येथे आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 आंतराष्ट्रीय पदार्पण करताच भारतीय संघाचा (Indian Team) युवा पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्लने (Devdutt Padikkal) इतिहास रचला आहे. पडिक्क्लचा जन्म 7 जुलै, 2000 रोजी झाला होता आणि टीम इंडिया (Team India) कडून खेळणारा तो 21 व्या शतकातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. पडिक्क्कलने त्याच्या पहिल्या सामन्यात 23 चेंडूत 29 धावा केल्या व वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होऊन माघारी परतला. नितीश राणा, रुतुराज गायकवाड आणि चेतन सकारिया यांनीही पडिक्क्ल समवेत या सामन्यात पदार्पण केले. पडिक्क्ल कर्नाटककडून घरगुती आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाकडून खेळतो. (IND vs SL 2nd T20I 2021: भारताचे सर्व धुरंधर फलंदाज अपयशी, धवन ब्रिगेडचे श्रीलंकेला विजयासाठी 133 धावांचे सोपं आव्हान)
पडिक्क्लने अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्याला लवकरच कर्नाटक रणजी ट्रॉफी संघात स्थान देण्यात आले. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याने महाराष्ट्रा संघाविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पदार्पण केले होते आणि 77 धावा ठोकल्या. पडिक्क्लला आयपीएल 2019 पूर्वी खेळाडूंच्या लिलावात आरसीबीने विकत घेतले होते. टीम इंडिया आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वांनी प्रभावित केत कर्नाटकचा युवा फलंदाज त्याच्या पहिल्या आयपीएलमध्ये या स्पर्धेचा उदयोन्मुख खेळाडू ठरला. पडिक्क्लने आरसीबीसाठी 15 सामन्यांत पाच अर्धशतकांसह 473 धावा केल्या. आयपीएल 2020 मध्ये पडिक्क्लने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिले आयपीएल शतक झळकावले. त्याने 52 चेंडूत 101 धावा ठोकल्या. अनकॅप्ड खेळाडूने केलेले हे सर्वात वेगवान शतक ठरले.
दरम्यान, भारताचा अष्टपैलू क्रुणाल पांड्याची कोविड-19 चाचणी सकारात्मक आल्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना मंगळवारी एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला. कृणालच्या जवळच्या संपर्कात आलेल्या आठ खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले असून यामध्ये हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, मनीष पांडे, पृथ्वी शॉ, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, आणि कृष्णाप्पा गौथम यांचा समावेश आहे. येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनकाने नाणेफेक जिंकून दुसऱ्या टी -20 मध्ये धवन ब्रिगेडला पहिले बॅटिंगसाठी बोलावले.