IND vs SL 2021: भारत-श्रीलंका वनडे आणि टी-20 सामन्यांच्या वेळेत मोठा बदल, जाणून घ्या नवे अपडेट्स
शिखर धवन आणि राहुल द्रविड (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL Series 2021: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुधारित वेळापत्रकानंतर श्रीलंका क्रिकेटने (Sri Lanka Cricket) दोन्ही संघात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नवीन वेळा देखील शेअर केल्या आहेत. श्रीलंका क्रिकेट संघाच्या शिबिरात कोविड-19 (COVID-19) च्या शिरकाव झाल्यामुळे भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात व्हाईट बॉल मालिका लांबणीवर पडल्याच्या वृत्ताला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अलीकडेच दुजोरा दिला होता. सोमवारी श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) आणि यजमान श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यांच्या वेळेत बदल झाल्याचे देखील समोर आले आहे. (IND vs SL 2021: भारत-श्रीलंका मालिकेच्या नवीन तारखांची घोषणा, जाणून घ्या कधी खेळला जाणार पहिला वनडे)

श्रीलंका क्रिकेटच्या पोस्टनुसार, द्विपक्षीय मालिकेतील वनडे सामने दुपारी 2:30 ऐवजी दुपारी 3 वाजता सुरू होतील. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने रात्री 8:00 वाजता सुरु होतील. अलीकडील COVID-19 उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या वनडे आणि टी -20 मालिकेत वरील बदल करण्यात आला आहे. राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या धवनच्या नेतृत्वातील दुसरी टीम इंडिया तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिकेत यजमान श्रीलंकेविरुद्ध 18 जुलैपासून मैदानात उतरतील.

“आमचे वैद्यकीय पथक श्रीलंका क्रिकेटच्या डॉक्टरांच्या टीमशी सतत संपर्कात आहे आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण करीत मालिका सुरू ठेवण्यास मदत करेल. आम्हाला खात्री आहे की दोन्ही देश आगामी काळात उत्साही खेळ करतील आणि आम्ही काही रोमांचक क्रिकेट खेळण्याचा तयारीत आहोत,” भारतीय क्रिकेट बोर्डाने जुन्या व्हाईट बॉल मालिकेचे सुधारित वेळापत्रक सामायिक केल्यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते. धवनच्या नेतृत्वातील टीम इंडिया 18 जुलैपासून श्रीलंका दौर्‍यावर तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसह दौऱ्याची सुरुवात करेल. त्यानंतर भारत 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान टी -20 आय मालिका खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचे सर्व सामने प्रसिद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.