IND vs SL 2nd T20I: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात (Indian Team) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 27 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) कोरोना संक्रमित आढळल्यावर सामना चोवीस तास पुढे ढकलण्यात आला. टीमचे आणखी आठ खेळाडू क्रुणालच्या संपर्कात आले आणि त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आला असून आता आजच्या सामन्यात बऱ्याच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. क्रुणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक झाली आहे. परंतु असे म्हटले जात आहे की सुरक्षेच्या कारणास्तव तो दुसर्या टी-20 सामन्यात ते भाग घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया (Team India) आज अनेक बदलांसह मैदानात उतरू शकते मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. (IND vs SL 2nd T20I: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात कृणाल पांड्याच्या जागेसाठी ‘हे’ 2 खेळाडू आहे दावेदार, पाहा भारताचा संभाव्य प्लेइंग XI)
स्पोर्ट्स तकच्या अहवालानुसार मनीष पांडे (Manish Pandey), हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), कृष्णाप्पा गौथम आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे क्रुणालच्या संपर्कात आलेले इतर खेळाडू आहेत. तथापि, या खेळाडूंमध्ये मनीष आणि गौतम यांनी पहिला टी-20 मुकाबला खेळला नाही त्यामुळे हे खेळाडू उपलब्ध नसल्यास भारताला किमान सात बदल करावे लागतील. अशा परिस्थितीत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि नितीश राणा हे संघात उर्वरित फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत भारताला सात गोलंदाजांना मैदानात उतरण्यास भाग पाडले जाईल. यासह, कर्णधारपदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर येईल.
दुसरीकडे, क्रुणालबद्दल बोलायचे झाले तर अष्टपैलूला संघातील अन्य खेळाडूंपासून वेगळे करण्यात आले आहे आणि दुसर्या हॉटेलमध्ये शिफ्ट केले गेले आहेत. मंगळवारी दुपारी त्याच्या संसर्गाची सकारात्मक चाचणी स्पष्ट करण्यात आली. क्वारंटाईन कालावधी आणि संसर्गाची नकारात्मक चाचणी आल्यानंतर क्रुणालला भारतात परत जाण्याची परवानगी दिली जाईल. दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने दुजोरा दिला आहे की दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज 8:00 वाजता सुरू होईल तर तिसरा टी-20 सामना उद्या, 29 जुलै रोजी खेळला जाईल.