IND vs SL 1st ODI: वेलकम बॅक! कुलदीप यादवचे दणदणीत पुनरागमन, एकाच ओव्हरमध्ये दोन लंकन फलंदाजांना धाडलं माघारी; नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
कुलदीप यादव (Photo Credit: Twitter)

IND vs SL 1st ODI: टीम इंडियाचा (Team India) चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने  (Kuldeep Yadav) भारतीय संघात (Indian Team) कमबॅक करताच कहर केला. कोलंबोच्या  (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. सामन्यात कुलदीप यादवने दणदणीत कमबॅक केले आणि तिसर्‍या षटकात दोन गडी बाद करत मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच्या परत आल्यावर चाहते आनंदी आहेत आणि ट्विटरवर त्यांचे खूप कौतुक करीत आहेत. कुलदीपच्या धमाकेदार पुनरागमनावर क्रिकेटर इरफान पठाणनेही (Irfan Pathan) प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी कुलदीपला इंग्लंडविरुद्ध घरच्या मर्यदित ओव्हर मालिकेत देखील संधी देण्यात आली होती मात्र तो त्या संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि पूर्णतः अपयशी ठरला. शिवाय, कुलदीपचा बऱ्याच वर्षानंतर युजवेंद्र चहलसोबत एकत्र प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. (IND vs SL 1st ODI: बर्थडे बॉय ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या वनडे पदार्पणावर प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले Watch Video)

कुलदीपने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर 17 व्या षटकात यजमान संघाला एकाच ओव्हरमध्ये दोन झटके दिले. कुलदीपने आपल्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर भानुका राजपक्षे 24 धावांवर माघारी धाडलं. लंकन फलंदाजाने यादवच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटवर योग्य तिथे बसला नाही आणि मिड-ऑनवर कर्णधार शिखर धवनने त्याचा शानदार कॅच पकडला. काही चेंडूंनंतर कुलदीपने मिनोद भानुकाची शिकार केली जो चांगल्या लयीत दिसत होता. श्रीलंकेच्या सलामी फलंदाजाने टॉस-अप चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटच्या बाहेरील बाजूस लागून पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या थेट पृथ्वी शॉच्या हाती गेला. श्रीलंकेचा डाव उधळण्यासाठी कुलदीपचा दुहेरी झटका पुरेसा होता. कुलदीपच्या दुहेरी दणक्यामुळे यजमान श्रीलंकेची स्थिती 3 बाद 89 धावा अशी झाली होती.

कुलदीप या धमाकेदार कमबॅकवर यूजर्स देखील खुश झाले आणि क्रिकेट चाहत्यांसोबत खेळाच्या जाणकारांनी देखील त्याचे तोंडभरून कौतुक केले.

इरफान पठाण यांनी कौतुक केले

फिल्म अभी बाकी है...

नॉट फिनिश्ड

आत्मविश्वास जास्त असेल

धोनीच्या टिप्स शिवाय दोन विकेट्स

दुसरीकडे, आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 नंतर पहिल्यांदा कुलदीप आणि चहल पुन्हा एकदा एकत्र खेळत आहेत. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनच्या वयाच्या 35 व्या वर्षी भारतासाठी कर्णधार म्हणून पदार्पण करणारा सर्वात वृद्ध खेळाडू ठरला.