Surya Kumar Yadav, Ishan Kishan (Photo Credit: Twitter)

IND vs SL 1st ODI: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची आजपासून सुरुवात झाली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करत आहे तर ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना टी-20 नंतर आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौर्‍यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रविवारी एकदिवसीय सेटअपमध्ये सूर्यकुमार आणि ईशानचे स्वागत केले. कोलोंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलने एक व्हिडिओ सामायिक केला आहे ज्यामध्ये द्रविड वनडे सेटअपमध्ये सूर्यकुमार आणि ईशानचे स्वागत करताना दिसून येत आहे. (SL Vs IND: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, शिखन धवनच्या आर्मीला श्रीलंकेने दिले 263 धावांचे टार्गेट)

“ही जाहीरपणे एक मोठी कामगिरी आहे, कुटुंबात दोन लोकांचे स्वागत करणे हे सुंदर आहे. हा बऱ्याच मेहनतीचा परिणाम आहे, त्यांच्यासाठी पण त्यांच्या कुटुंबासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. आज ईशान किशनचा वाढदिवस असल्याने दुहेरी उत्सव आहे,” पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी द्रविडने संघाला संबोधून सांगताना म्हटले. किशनला कर्णधार शिखर धवनने डेब्यू कॅप दिली तर उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने सूर्यकुमारकडे ही कॅप दिली. दासुन शनाकाच्या नेतृत्वात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंका मालिकेसाठी भारताने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच धवनची आर्मी मालिका विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यासारख्या स्टार खेळाडूंची अनुपस्थिती असूनही धवन, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर आणि दीपक चाहर यांचा समावेश असलेल्या पाहुण्या संघाचे श्रीलंकेपुढे आव्हान आहे.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे ईशान आणि सूर्यकुमारने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेतून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यादव आणि किशनने 14 मार्च रोजी टी-20 डेब्यू केले होते. दरम्यान, ईशान किशनचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून टीम मॅनेजमेंटने त्याला एक अद्भुत भेट दिली. किशन आपल्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. गुरशरण सिंह किशनपूर्वी आपल्या वाढविताशी डेब्यू करणारा भारतीय क्रिकेटपटू होता. त्याने आपला पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 मार्च 1990 रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला होता.